Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

11047 0

नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह इन पार्टनर महिलेची हत्या केली आहे. या हत्येमागील कारणदेखील धक्कादायक होतं. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (40 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर श्याम अशोक पवार असे आरोपीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
आरती हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कौटुंबिक कारणातून तिचा पती तिला सोडून दुसरीकडे रहायला आहे. याच कालावधीत तिची ओळख श्याम पवार याच्याशी झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती मुलांसह श्यामसोबत राहत होती. दरम्यान, आरती व श्यामचे काहीना काही कारणातून खटके उडत होते. त्यातच मंगळवारी रात्री नऊ वाजता श्याम याने कस्तुरबा नगरातील घरी असताना मुलाला चापट मारली. त्यातून आरतीने श्यामला विचारणा केली असता दोघांत भांडणे झाली. त्याचवेळी संतापाच्या भरात श्यामने किचनमधील धारदार सुरीने तिच्या पाठीमध्ये वार केले.

यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा केली असता आरतीच्या पाठीत एक छोटी जखम दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून खून केल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकचे सरकारवाडा पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन…
Accident News

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला. या अपघातामध्ये एका…
Manoj Jarange

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Posted by - March 1, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं मराठा समाजासाठी (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक…
Video

Video: मरणानंतरही नरक यातना! रस्ता नसल्याने मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची आली वेळ

Posted by - August 10, 2023 0
नांदेड : एकीकडे आपला देश प्रगतीच्या दिशेने प्रवास करत असताना आता नांदेडमधून (Video) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *