nagpur crime

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! 6 ते 7 जणांकडून टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला

5241 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर(Nagpur Crime)  धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कारमधून आलेल्या 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. राकेश मिश्रा (वय 27 वर्षे) आणि रवी जयस्वाल (वय 28 वर्षे) दोघेही रा राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर अशी हल्ला करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यामधील राकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राकेश आणि रवी हे या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते.

काय घडले नेमके?
हे दोघे दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंड झाकले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि कारमध्ये बसून फरार झाले.

या हल्ल्याची एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

Posted by - April 18, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण…

#CORONA UPDATES : राज्याचं टेन्शन वाढलं ! कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

Posted by - March 13, 2023 0
देशभरात इन्फ्ल्यूएंझा वाढत असताना काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे निर्देश…

क्रिकेटर ते बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री; कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची…

सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी…

” महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले होते…!” केरळ मधील कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेत , वाचा सविस्तर प्रकरण …

Posted by - August 17, 2022 0
केरळ : हे प्रकरण आहे केरळमधील कोझिकोड सत्र न्यायालयातील एका लैगिक छळ आरोपीच्या जमीन अर्ज सुनावणी दरम्यानचे … सिविक चंद्रन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *