Thane News

Thane News : प्रवाशांच्या मदतीसाठी RPF जवान ट्रेनमध्ये चढला, मात्र उतरताना घात झाला अन्…

2900 0

ठाणे : कसारा रेल्वे स्थानकात एक धक्कादायक (Thane News) घटना घडली आहे. यामध्ये एका RPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी डब्यात गेलेल्या (Thane News) आरपीएफ जवानाचा ट्रेनमधून उतरताना तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 6.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
कल्याणमधील रहिवासी असलेले आरपीएफ जवान दिलीप सोनवणे (53) शनिवारी रात्री कसारा येथे रात्री ड्युटीवर होते. सकाळी सातच्या सुमारास एलटीटी-कानपूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी त्यांना मदतीसाठी हाक मारली. तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वेत चढले.यानंतर गाडी सुरु झाली. आणि त्यानंतर चालत्या ट्रेनमधून आरपीएफ जवान दिलीप सोनवणे यांनी उतरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

कसारा येथील इन्स्पेक्टर सैनी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. दिलीप सोनवणे ड्युटीवर होते. ते ट्रेनमधून खाली उतरत असताना प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत हा अपघात झाला असे इन्स्पेक्टर सैनी म्हणाले आहेत. आरपीएफचे जवान दिलीप सोनवणे हे कुटुंबासह कल्याणमध्ये राहत होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. या घटनेमुळे सोनावणे यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

Dagdusheth Ganpati

Dagdusheth Ganapati : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेत मोठा बदल

Posted by - August 23, 2023 0
पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganapati) बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात.…

शिवापूर टोल नाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद; शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा

Posted by - May 1, 2022 0
शिवापूर येथील टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर टोलनाका कृती समिती आक्रमक झाली असून या कृती समितीच्या वतीनं पुण्यातील कात्रज चौकात धरणं आंदोलन…

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी,…
Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *