Tanaji Sawant

Tanaji Sawant : कळवा रुग्णालयातील18 जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

770 0

पुणे : कळवा रुग्णालयाच्या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा (Tanaji Sawant) अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 12 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचाअहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

नेमके काय म्हणाले तानाजी सावंत?
ठाणे रुग्णालयातील घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवालएक ते दोन दिवसांत येईल. 13 जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर 4 हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे. चौकशी समितीचा अहवाल येताच याबाबत कारवाई करण्यात येईल. हे प्रकरण कशामुळे झालं आहे, याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. आता चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघेही या घटनेवर लक्ष ठेऊन आहेत, अशी माहिती तानाजी सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

थांग-ता, गतका क्रीडा प्रकारातही महाराष्ट्र अव्वल;शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे जोरदार सराव शिबिर सुरू

Posted by - May 23, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया गेम्ससाठी महाराष्ट्राच्या गतका आणि थांग ता या क्रीडा प्रकारातील संघाचा सराव सुरू आहे. येथील…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात पुण्यातील 7 जणांचा समावेश

Posted by - July 2, 2023 0
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर (Buldhana Bus Accident) शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या…
Chandrakant More

Chandrakant More : शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांचे महाराष्ट्र राज्यातील नागरिक बांधवाना जाहीर आवाहन

Posted by - November 30, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक बांधवांना नागरिक शेतकरी संघाचे वतीने संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे (Chandrakant More) जाहीर आवाहन करतआहेत…

गॅस गिझर गळतीने एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचे दुर्दैवी निधन

Posted by - February 7, 2022 0
नाशिक- गॅस गिझरच्या गळतीमुळे एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. रश्मी गायधनी…
Fraud

Fraud News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांना 29 लाखांचा गंडा

Posted by - June 23, 2023 0
पुणे : पुण्यामधून फसवणुकीचे (Fraud News) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *