पुणे येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत तांदूळ महोत्सव ; अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

361 0

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये आदी शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा आणि शेतकरीगटांना शेतमालाच्या विक्रीतून योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी १३ ते १५ मार्च या कालावधीत कृषी विभाग व ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) यांच्यावतीने तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ मार्च रोजी शिवाजीनगर येथील कृषी भवन इमारतीजवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे, साखर संकुल शेजारी, के. बी. जोशी पथ, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत महोत्सव असणार आहे. तांदूळ महोत्सवास ग्राहकांनी भेट देऊन रास्त दरातील खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Shirur Lok Sabha

Shirur Loksabha : शिरुर मतदारसंघात जोरदार राडा; अमोल कोल्हेंनी ‘तो’ व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Posted by - May 13, 2024 0
शिरूर : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले; मागण्या मान्य

Posted by - November 10, 2022 0
पुणे : MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला…

ठाकरे परीवाराविरोधात किरीट सोमय्या आक्रमक! ‘या’ प्रकरणावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात करणार तक्रार

Posted by - January 1, 2023 0
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस…
Imran Khan

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Posted by - May 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्र्ष्टाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. इस्लामाबादमध्ये…

स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन

Posted by - June 11, 2023 0
स्कूल ऑफ गव्हर्मेंटच्या वतीनं राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून या संमेलनात देशभरातील तब्बल 4500 आमदारांचा सहभाग राहणार असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *