Pune Crime News

Pune Crime News : 9 दिवसांनी सापडलेल्या पुण्यातील आयटी अभियंत्याच्या मारेकऱ्यांना अखेर अटक

847 0

पुणे : आयटी अभियंता सौरभ पाटील हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर (Pune Crime News) आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत सौरभच्या गावातीलच एकाला अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. मृत सौरभ आणि आरोपी यांच्यात काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्टला सौरभचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. आयटी अभियंता सौरभ हा 28 जुलैपासून बेपत्ता होता. त्यानंतर जवळपास नऊ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. रीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या. त्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण सौरभची हत्या कोणी, का आणि कुठे केली? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. यावेळी ही हत्या त्याच्याच कोपरगावातील एका तरुणाने केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.सौरभ आणि आरोपीचे एका प्रकरणावरुन वाद होते. काही महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. त्यानंतर सौरभ हिंजवडीतील एका आयटी कंपनीत नोकरीला लागला.मात्र आरोपीच्या मनात त्याच्याबद्दल अजूनही राग होता. याच रागातून त्याने ही हत्या केली आहे.

सौरभ पाटील हा हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत कामाला होता. त्याची दुचाकी ही खेड तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच दुचाकीची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या कठड्यावर आढळली होती. मात्र तरी देखील त्याचा शोध कुठे लागत नव्हता. अखेर पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या सांडभोरवाडी जवळ असलेल्या जुन्या खेड घाटात वन विभागाच्या हद्दीत उतरत्या झाडाझुडपांचे वाढलेल्या गवतातील शेतात सौरभ पाटील यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

Share This News

Related Post

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…

Pune News : पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मागणी

Posted by - January 10, 2024 0
पुणे : सासवड मधील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे एकीकडे सासवड नगरपालिकेच्या कार्यालयात बसून आवाहन केले जाते त्याच नगरपालिकेचे कर्मचारी पिण्याचे…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी १६ जण इच्छुक

Posted by - April 1, 2023 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्च राेजी संपली. या पदासाठी १६ जणांनी अर्ज दाखल केले…

दुर्दैवी! पुण्यातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे: पुणे शहरात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून सदाशिव पेठ, भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमधे आगीची घटनेत एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *