Crime News

Crime News : लोकांच्या ‘त्या’ त्रासाला वैतागून आरोपीने बायकोची हत्या करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला; पण…

698 0

बंगळुरू: बंगळुरूमध्ये (Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या पत्नीची हत्या (Crime News) करून पतीने पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. काही जण पत्नीला चोर म्हणायचे. त्यामुळे पती नाराज झाला होता. त्याशिवाय त्याच्या डोक्यावर 11 लाख रुपयांचं कर्ज होतं. त्याची परतफेडही त्याला जमत नव्हती. त्यामुळे त्याने हे टोकाचे उचलायचे ठरवले.

काय घडले नेमके?
सरिता (35) असे मृत महिलेचे नाव आहे तर थरानाथ (37) असे आरोपी पतीचे नाव आहे. हे दोघेही मूळचे मंगळुरुचे रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच दोघे बंगळुरूत स्थायिक झाले. मंगळुरुत असताना सरितावर चोरीचा आरोप झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सरिताला चोर म्हणून हिणवलं जात होते. यामुळे हे दोघेजण बंगळुरुत आले. पण तिथेही जोडप्याच्या ओळखीचे काही जण राहत होते. ते सरिताला चोर म्हणून हिणवायचे. या सगळ्याला दोघेही वैतागले होते.

Jalgaon Crime : शिंदे गटाच्या आमदाराच्या समर्थकांकडून पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण

आरोपी पतीवर 11 लाखांचं कर्ज होतं. त्याची परतफेड करणं त्याला जमत नव्हतं. तो बंगळुरूत पाणीपुरीचं दुकान चालवायचा. पत्नीला मिळणारी वागणूक आणि डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर याला कंटाळून त्याने सरितासह स्वत:ला संपवण्याचं (Crime News) ठरवलं. मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यानं सरिताची दोरीनं गळा आवळून हत्या केली. ही हत्या केल्यानंतर आरोपी पती मृतदेहाजवळ काही तास बसून राहिला. त्यानं स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा धीर झाला नाही. यानंतर त्याने घरमालकाला सगळा प्रकार सांगून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

crime news

Mumbai Crime: आधी हात व पाय बांधले आणि मग तोंडात रुमाल कोंबून…. केअर टेकरचे मालकासोबत धक्कादायक कृत्य

Posted by - May 8, 2023 0
मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 85 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची त्याच्याच घरी केअर…

उत्तराखंड : बद्रीनाथ मार्गावरील जोशीमठमधील घरांना का जात आहेत तडे ?

Posted by - January 17, 2023 0
बद्रीनाथ : गावाकडच्या घराला फारफार तर पावसाळ्यात किंवा वादळात एखाद्या भिंतीला तडा जातो पण इथं अख्या गावाला तडा गेलाय. हो…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर अज्ञात लोकांकडून दगडफेक

Posted by - January 31, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापुरातील दसरा चौक येथे शाळेय सहलीच्या बसवर दगडफेक…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - October 31, 2023 0
बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक…
sanjay raut

शरद पवार यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची धमकी

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : काही वेळापूर्वी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनादेखील जीवे मारण्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *