Rohit And Babar Azam

World Cup Schedule Reschedule : विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल; आता ‘या’ दिवशी पार पडणार भारत – पाकिस्तान महामुकाबला

687 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक (World Cup Schedule Reschedule) राहिले आहेत.10 संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक होणार आहे. स्थानिक स्थिती आणि काही संघाच्या विनंतीवरून आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात (World Cup Schedule Reschedule) काही बदल केले आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार आयसीसीने नऊ सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. यामध्ये भारताच्या 2 सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी होणारा सामना आता 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे.

CWC23 Full Fixtures

कोणकोणत्या सामन्यात झाला बदल?
10 ऑक्टोबर – इंग्लंड vs बांगलादेश , सकाळी 10.30 वाजता
10 ऑक्टोबर – पाकिस्तान vs श्रीलंका, दुपारी 2 वाजता
12 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका, दुपारी दोन वाजता
13 ऑक्टोबर – न्यूझीलंड vs बांगलादेश, दुपारी दोन वाजता
14 ऑक्टोबर – भारत vs पाकिस्तान, दुपारी दोन वाजता
15 ऑक्टोबर – इंग्लंड vs अफगाणिस्तान, दुपारी दोन वाजता
11 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश, सकाळी 10.30 वाजता
11 नोव्हेंबर – इंग्लंड vs पाकिस्तान, दुपारी दोन वाजता
12 नोव्हेंबर – भारत vs नेदरलँड, दुपारी दोन वाजता

‘या’ दिवशी पार पडणार भारत विरुद्ध पाकिस्तान ‘महामुकाबला’
तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तानी संघ भारतात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा महासंग्राम पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तर 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पार पडणार आहे.

Share This News

Related Post

Ajinkya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले

Posted by - January 2, 2024 0
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये…
MS Dhoni

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Posted by - January 5, 2024 0
मुंबई : भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एम एस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यवसायिक भागीदारांविरोधात रांची कोर्टात क्रिमिनल…
Video

VIDEO: धबधब्यावर रील बनवताना तरुणाचा पाय घसरला; शेवटचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Posted by - July 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पावसाळा सुरु आहे. सगळेजण या पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. या पावसाचा आनंद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *