Intimate Tips

Intimate Tips : पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी

438 0

आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना (Intimate Tips) छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी (Intimate Tips) काय करावं काय नाही यासंदर्भात आज आपण जाणून घेऊयात…

इंटीमेट होण्याआधी सामान्यपणे भरपूर जेवण करु नये. तसेच फार चमचमीत आणि मसालेदार खाणंही टाळलं पाहिजे. अशा जेवणामुळे पोटात जळजळ किंवा अपचनासंदर्भातील समस्या होऊ शकतात.

इंटीमेट होण्याआधी काहीजणांना मद्यपान करण्याची सवय असते. मात्र हे नातेसंबंधांच्या दृष्टीने योग्य नाही. एखादा ग्लास वाईन किंवा कॉकटेल वातावरण निर्मिती आणि आराम मिळावा म्हणून सेवन करता येईल. मात्र अती मद्यपान केल्यास भान हरपण्याबरोबर शारीरिक क्षमतांवरही मर्यादा आणतं.

सामान्यपणे कॉफीमध्ये आढळून येणारं कॅफीन हे रसायन हृदयाची गती वाढते. तसेच यामुळे चीडचीडही वाढण्याची शक्यता असते. कॅफीनमुळे व्यक्ती बऱ्याच गोष्टींबद्दल विचार करुन तो त्या गोष्टींची चिंता करु लागतो. रोमॅन्टीक होण्याच्या उद्देशाने हे वागणं बरोबर ठरणार नाही म्हणूनच कॅफीनचे सेवन टाळावे.

जास्त मसालेदार जेवण केल्यास नाराज होणे, शरीरामधील अ‍ॅसिडीटीची लेव्हल वाढणे आणि अन्य पचनासंदर्भातील समस्या निर्माण होतात. यामुळे एखादी रोमॅन्टीक डेट खराब होऊ शकते.

लसूण आणि कांदा – हे उग्र पदार्थ आहेत. या पदार्थांच्या सेवनानंतर त्यांचा वास बराच काळ तोंडामध्ये आणि श्वासात राहतो. अशा गोष्टींसहीत जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवणं शक्य नसतं. हे दोघांसाठीही हानीकारक ठरु शकते.

दुग्धजन्य पदार्थांमुळे सूज येण्याबरोबर गॅसची समस्याही निर्माण होऊ शकते. तसेच श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण करण्यासाठीही हे पदार्थ कारणीभूत ठरु शकतात.

शेंगा आणि बीन्ससारख्या भाजांमुळे पचनासंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. या भाज्यांमुळे पोटांसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकते.

Share This News

Related Post

BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

Posted by - August 19, 2022 0
प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच…

NMACC च्या उदघाटन समारंभात सोन्याचा ब्लाउज घातलेल्या महिलेचीच चर्चा !

Posted by - April 8, 2023 0
मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या शानदार उदघाटन सोहळ्याला देश विदेशातील स्टार्स, राजकीय नेते, बॉलिवूडचे कलाकार मोठ्या संख्येने…
Immunity

Immunity : थंडीत ‘या’ प्रकारे वाढवा आपली रोगप्रतिकारक शक्ती; सगळे आजार पळतील दूर

Posted by - November 29, 2023 0
गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल (Immunity) पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून कुठेच थंडीची चाहूल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *