Nagpur Crime News

Nagpur Crime News : मी ‘नासा’त शास्त्रज्ञ, तुम्हालाही नोकरी लावतो म्हणत तरुणाचा युवकांना 5.31 कोटींचा चुना

899 0

नागपूर : आपण अनेकदा एखाद्याच्या भूल थापांना बळी पडतो. त्यामुळे अनेकदा आपली आर्थिक फसवणूक (Nagpur Crime News) केली जाते. नागपूरमध्ये काहीसा असाच प्रकार (Nagpur Crime News) घडला आहे. यामध्ये स्वतःला नासाचे शास्त्रज्ञ म्हणवत एका तरुणाने तब्बल 111 बेरोजगार तरुणांना नासामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना 5.31 कोटींचा चुना लावला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपीचे नाव ओमकार महेंद्र तलमले असे आहे. त्याने 25 जुलै 2023 रोजी पैशांचे आमिष दाखवून कोंढाळीजवळ काही गुंडांच्या मदतीने नागपूर शहरातील दोन व्यावसायिकांचे अपहरण केले. त्यानंतर अमरीश देवदत्त गोळे आणि निरलकुमार जयप्रकाश सिंग यांचे खून करून त्यांचे मृतदेह वर्धा जिल्ह्यातील नदीत फेकून दिले. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी ओमकारला अटक केली आहे. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

ओमकारने अनेक तरुणांना बनावट नियुक्तीपत्रेही पाठवली होती. नासामध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने अनेक युवकांची फसवणूक केली आहे. मनीषनगर जयदुर्गा सोसायटी एकदंता अपार्टमेंटमधील रहिवासी अश्विन अरविंद वानखेडे आणि ओमकार तलमले हे एकाच ढोल-ताशा पथकातील असल्याने त्यांची ओळख होती. ओमकारने त्याला सांगितले की तो नासामध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून काम करतो.

यानंतर ओमकारने वाडीस्थित रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये ऑफिस स्टाफ क्लास बी, ऑफिस अ‍ॅडमिन, सीनियर अ‍ॅडमिनची मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. येथील अधिकाऱ्यांशी आपली चांगली ओळख असल्याचे सांगून त्याला नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपये बँक ऑफ बडोदाच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्वारस्य असल्यास कळवा असेदेखील त्याने सांगितले.

यानंतर ओमकारच्या या गोड बोलण्याला भुलून अश्विन वानखेडेसह 111 जणांनी प्रत्येकी दोन लाख रुपये त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले. त्याने प्रत्येकाच्या ई-मेलवर बनावट नियुक्तीपत्रे पाठवली. यानंतर हे सगळेजण वाडीच्या प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्रात रुजू होण्यासाठी गेले असता त्यांनी बनावट नियुक्तीपत्र सादर केले. मात्र तिथे त्यांना ओमकार तलमले सारख्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व पीडित बेरोजगारांनी आर्थिक गुन्हे शाखा अर्चित चांडक यांची भेट घेऊन त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर अर्चित चांडक यांच्या आदेशावरुन बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांनी ओमकारविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Share This News

Related Post

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022 0
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी…
Satara Crime

Satara Crime : तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींचा; ‘त्या’ एका पावतीवरून पोलिसांनी लावला छडा

Posted by - October 4, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Crime) एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये काही दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची हद्दीत एका…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Posted by - February 19, 2023 0
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात…

धन्यवाद गुजरात! लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला! गुजरात विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

Posted by - December 8, 2022 0
गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढे यश…

Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *