Bees Attack

Bees Attack : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

779 0

गोंदिया : गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांनी हल्ला (Bees Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण हल्ल्यात (Bees Attack) दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला. यामुळे त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
गोंदिया जिल्ह्याच्या कुऱ्हाडी गावात शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला तर पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले अशी मृतांची नावे आहेत. तर अंकित लक्ष्मीचंद पटले (27), ग्यानीराम उईके (57), माया आमडे (42) यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये मंदा आमडे (42), प्रमिला चौधरी (30) यांचादेखील समावेश आहे. हे सर्व कुऱ्हाडी गावचे रहिवासी आहेत.

सध्या सर्वत्र भात लावणीचे काम सुरु आहे. कुऱ्हाडी गावचे रहिवासी शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू होते. सर्व शेतमजूर भात लावणीचे काम करुन संध्याकाळी एकत्र घरी परतत होते. त्यावेळी अचानक मधमाश्यांनी हल्ला (Bees Attack) केला. या हल्ल्यात शेतमालक लक्ष्मीचंद पटले, त्यांचा मुलगा अंकित पटले व माया आमडे, मंदा आमडे, प्रमिला चौधरी, ज्ञानीराम उईके हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर तात्काळ सर्व जखमींना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान सुमन आमडे यांचा रात्री उशिरा,तर लक्ष्मीचद पटले यांचा पहाटे 4 च्या सुमारास मृत्यू झाला.

Share This News

Related Post

Gadchiroli News

Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला; गडचिरोलीमधील धक्कादायक घटना

Posted by - July 25, 2023 0
गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला…
Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget 2024) अधिवेशन सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरु झालं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री…

पुणे : महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

Posted by - September 22, 2022 0
पुणे : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून…
pune police

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Posted by - April 4, 2023 0
पुणे: पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस…

PA Sudhir Sangwan Arrest : सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर ड्रग्स ओव्हर डोसने ; आदल्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळले ; गोवा पोलिसांची माहिती

Posted by - August 26, 2022 0
बिग बॉस फेम आणि भाजपने त्या सोनाली फोगाट यांचा अचानक मृत्यू झाला . हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *