Sangli News

Sangli News : सांगली हादरलं ! डोक्यात फावड्याने वार करुन बापाने काढला लेकाचा काटा

58854 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) बाप आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Sangli News) व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी तुकडे केल्यानंतर पोत्यात भरले आणि काही शरीराचे तुकडे गणेश तलाव येथे आणून टाकले. रोहित राजेंद्र हंडीफोड (वय 29, रा. मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातील सुभाषनगर येथील हंडीफोड मळा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर वडील राजेंद्र यल्लप्पा हंडीफोड हे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. याप्रकरणी वडील राजेंद्र यल्लाप्पा हंडीफोड (वय 50) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिरजेतील गणेश तलाव मागे लक्ष्मी मंदिराजवळ राजेंद्र हंडीफोड यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. रोहित हा सुद्धा वडिलांचा दूधाचा व्यवसाय करीत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो व्यसनाच्या खूप आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. यामुळे तो घरात नेहमी भांडण करीत होता. दारुचे व्यसन आणि गुन्हेगार मित्रांच्या संगतीमुळे रोहित बिघडला होता. रोहित याच्यावर मारामारी आणि इतर गुन्हे दाखल झाले होते.

रोहित हा दररोज दारु पिऊन घरात त्रास देत असल्याने पिता राजेंद्र यांच्याशी त्याचे वारंवार भांडण होत होते. दररोजच्या या त्रासाला राजेंद्र वैतागले होते. घटनेच्या दिवशीदेखील रोहित हा दारु पिऊन घरात आल्यानंतर त्याने वडिलांशी भांडण काढले. यावेळी रागाच्या भरात राजेंद्र यांनी मुलगा रोहित याच्या डोक्यात फावड्याने वार करून त्याची हत्या केली. यानंतर त्यांनी कटरने त्याचे हात पाय आणि मुंडके तोडून पोत्यात भरुन जवळच असलेल्या गणेश तलावात टाकून दिले. यानंतर आरोपी वडिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा मान्य करत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोटच्या मुलाचा बापाकडून क्रूरपणे खून करण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता.

Share This News

Related Post

President Draupadi Murmu

President Draupadi Murmu : ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानांही मंदिर गाभाऱ्यात प्रवेश नाही?’, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Posted by - June 26, 2023 0
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी 20 जून रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा केला. राष्ट्रपती द्रौपदी…
Washim News

Washim News : बेपत्ता तरुणाचा कुटुंबाकडून शोध सुरु असताना अचानक एक गोणी सापडली अन्…; वाशिम हादरलं!

Posted by - October 15, 2023 0
वाशिम : वाशिममधून (Washim News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये वाशिमच्या अनसिंग परिसरातील रहिवासी असलेल्या सलमान शेख या…
Love Story

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : पाकिस्तान सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला…

अभिजीत बिचुकलेंची अजब गजब मागणी ; म्हणे, ” माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…! ” कारण ,

Posted by - February 23, 2023 0
पुणे : सध्या अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार आहेत. आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *