Mantralaya

Suicide Attempt : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

538 0

मुंबई : मुंबईतील मंत्रालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर एका व्यक्तीने हातावर कटरने वार करून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. त्या व्यक्तीविरोधात आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आले आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
सुरेश पांडुरंग जगताप असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मूळचे सातारा येथील फलटणचे रहिवासी असलेले सुरेश यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्वप्रथम प्रवेशिका(पास) घेऊन बुधवारी मंत्रालयात प्रवेश केला. यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या दालनासमोर येताच हातावर कटरने वार करण्यास सुरूवात केली. तेथील पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांना उपचारासाठी जी. टी. हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यानंतर त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांना फौजदारी दंड प्र.सं. कलम 41 (अ) (1) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने डाव्या हाताला कटरने जखम केली आहे. जीटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले असून आत्महत्येत वापरण्यात आलेले कटर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेने बजावली 478 धोकादायक वाड्यांना नोटीस;38 अतिजोखमीचे वाडे जमीनदोस्त

Posted by - July 7, 2022 0
पुणे: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये अशी…

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव

Posted by - December 29, 2022 0
नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे.अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास…

‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची 24 पथके तैनात

Posted by - December 26, 2022 0
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहर…

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचं निधन; वयाच्या 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - May 2, 2023 0
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.…

#चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

Posted by - February 25, 2023 0
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *