OBC Reservation

OBC Reservation : 6 वर्षानंतर ओबीसींच्या आरक्षणाबाबत रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

378 0

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) फायद्यासंबंधित त्रुटी सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या रोहिणी आयोगाने (Rohini Committee) आपला अहवाल आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तब्बल 6 वर्षानंतर रोहिणी आयोगाने हा अहवाल सादर केला आहे.

रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द
6 वर्षानंतर रोहिणी आयोगाने राष्ट्रपतींकडे अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता मंडल आयोगाने निर्माण केलेल्या मागासवर्गीय आरक्षणाचा आराखडा नव्याने तयार करायचा का, हा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. रोहिणी आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केल्याचे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. या अहवालात नेमके काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नेमका काय आहे रोहिणी आयोग?
ओबीसींच्या उप-वर्गीकरणासाठी 2017 मध्ये रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सुमारे सहा वर्षे 14 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ओबीसी उपवर्गीकरण आयोगाने सोमवारी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी आपला अहवाल सादर केला. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची नियुक्ती इतर मागासवर्ग आयोगाने ओबीसींच्या उप-वर्गीकरणाची तपासणी करण्यासाठी केली होती. 2 ऑक्टोबर 2017 रोजी रोहिणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

Share This News

Related Post

MLA Disqualification

MLA Disqualification : शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत ‘या’ दिवशी होणार अंतिम फैसला

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यत्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) कारवाईला वेग देण्याचा निर्णय…
drowning hands

पोटच्या मुलाला वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 5, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये पाण्यात बुडून मायालेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला…
Babanrao Taiwade

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - December 2, 2023 0
नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षण (Reservation) देण्याचा आग्रह मनोज जरांगे पाटील यांचा आहे, तर ओबीसीमधून…

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती

Posted by - March 28, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर एकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजीद मेमन यांनी आता मोदींचं…
Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Posted by - January 18, 2024 0
अयोध्या : 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यासाठी (Ram Mandir Inauguration) देश-विदेशातील हिंदूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *