Pune-PMC

Property Tax : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी देण्यात आली मुदतवाढ

744 0

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर (Property Tax) विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गोची झाली. सर्वसाधरण करामधील 5 टक्के सवलतीची आज अंतिम (31 जुलै) तारीख आहे. तसेच थकबाकीवर 2 टक्के शास्तीची कर आकरला जाणार आहे. त्यामुळे कर भरणा केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने मिळकत कर भरणाऱ्यांना दिलासा ठेण्याचे ठरवले आहे.

पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना 15 मे ते 31 जुलै या अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर (Residential Tax) 5 टक्के सूट देण्यात आली होती. यातून सुमारे 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले. आज या सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने मिळकत भरण्यासाठी नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाबाहेर रांगा लावल्या होत्या. त्याचबरोबर एकाचवेळी अनेक नागरिक ऑनलाईन कर भरत होते. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणादेखील कोलमडल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान आता मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांना 2 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News

Related Post

पुणे शहरात रस्त्यांवरील खड्डे पडल्यामुळे सात अभियंत्यांना आयुक्तांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस

Posted by - August 6, 2022 0
पुणे:शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे निकृष्ट कामामुळे पडल्याचे समोर आल्यानंतर आता ठेकेदारासोबत अधिकार्‍यांवरही ठपका ठेवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून…

मानसिक आरोग्य : पतिपत्नीच्या नात्यामध्ये सातत्याने भांडणे होऊन दुरावा येतोय ? या गोष्टी करून पहा, नक्की फरक जाणवेल

Posted by - February 3, 2023 0
स्वतःला वेळ द्या तुम्ही स्वतः खुश आणि समाधानी असाल तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेऊ शकता हे सत्य आहे. १ दिवस…

होलिका दहनाचे काय आहे महत्व ; कशी करावी पूजा ? वाचा आख्यायिका आणि महत्व

Posted by - March 6, 2023 0
होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन…

रशिया कडून “त्या” 17 शत्रूराष्ट्रांची यादी प्रसिद्ध

Posted by - March 8, 2022 0
रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर विरोध करणाऱ्या देशांना रशियाकडून इशारा देण्यात आला होता. रशियाने इशारा देताना जे युक्रेनच्या मदतीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *