Stuart Broad Retirement

Stuart Broad Retirement : स्टुअर्ट ब्रॉडने Ashes सीरिजदरम्यान अचानक घेतली निवृत्ती

515 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट टीमचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने (Stuart Broad) निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. स्टु्अर्ट ब्रॉर्ड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ‍ॅशेस सीरिजमधील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी हा मोठा निर्णय घेतला आहे. ब्रॉर्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत खेळणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

ब्रॉर्डची कसोटी कारकीर्द
स्टुअर्ट ब्रॉड याने 167 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. ब्रॉडने 167 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 602 विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ५ वा गोलंदाज ठरला आहे. स्टुअर्टच्या आधी मुथ्य्या मुरलीथरन, शेन वॉर्न, जेम्स एंडरसन आणि अनिल कुंबळे या चौघांनी सर्वाधिक विकेट्स घेतले आहे.

स्टुअर्ट ब्रॉड निवृत्तीची घोषणा
उल्लेखनीय बाब म्हणजे ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. ब्रॉडने टेस्टमध्ये 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3 हजार 656 धावा केल्या आहेत. ब्रॉड अखेरचा वनडे सामना 2016 आणि टी 20 सामना 2014 मध्ये खेळला होता. इंग्लंडने 2010 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. ब्रॉड त्या टीमचा भाग राहिला होता. ब्रॉडने 121 वनडेत 178 आणि 56 टी मॅचेसमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत.

Share This News

Related Post

इंग्लंड खेळ जगत : ‘या’ कारणाने Ben Stokes या अष्टपैलू खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - July 18, 2022 0
इंग्लंड: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून…
Cricket Team

WTC फायनलसाठी टीम इंडियात बदल; ऋतुराजच्या जागी मुंबईच्या ‘या’ फलंदाजाला देण्यात आली संधी

Posted by - May 29, 2023 0
मुंबई : डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Austrelia) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड…
Loksabha News

Loksabha News : संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; 3 अज्ञात तरुणांची सभागृहात घुसखोरी

Posted by - December 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. संसदेचे कामकाज सुरु असताना 3 अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून…
Punit Balan

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Posted by - December 27, 2023 0
दुबई : वृत्तसंस्था – पुनित बालन ग्रुप (Punit Balan) ईगल्सने वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे…
Ind Vs Eng 5th Test

Ind Vs Eng 5th Test : धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ दिग्गज खेळाडूचा टीममध्ये समावेश

Posted by - February 29, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng 5th Test) पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील पाचवा कसोटी सामना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *