Madan Das Devi

RSS चे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार ! कोण होते मदन दास देवी?

613 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी काल पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मदन दास देवी यांच्या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया….

आदरणीय मदनदासजी देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1959 मध्ये प्रवेश घेतला. एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्यात शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. ते 1969 पासून संघ प्रचारक होते. अभाविपमध्ये त्यांनी 1975 पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी अ.भा. संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या आहेत.

आज सकाळी 9 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर 11.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सह सरकार्यवाह सुरेश सोहनी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हे पुण्यात दाखल झाले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील हजर राहणार आहेत.

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : वन खात्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वडिलांचं…

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे होणारे आजार कोणते..? जाणून घ्या

Posted by - March 21, 2022 0
1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या…
Pune Video

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Posted by - December 29, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Video) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. काल वडगाव शेरी येथील घटना ताजी असताना आता…
Pune News

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 3, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *