महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

116 0

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक, राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांची नेमणूक तसेच ओबीसी आरक्षणाबाबत आज दोन्ही सदनात पारित केलेल्या विधेयकाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

नऊ मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी. याबाबतचे पत्र महाविकास आघाडी सरकारकडून याआधीच राज्यपालांना देण्यात आल आहे. मात्र, अद्याप राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली.ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेल्या सुधारित विधेयकामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी मध्यप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा करत आहे. याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात पारित झाले असून या विधेयकाबाबत राज्यपालांचीसोबत दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

Share This News

Related Post

बारामतीत भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ )

Posted by - May 18, 2022 0
बारामती- बारामतीतील मोरगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू…
ravindra vadiv

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

Posted by - April 23, 2024 0
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भारत आदिवासी पार्टी कडून देखील उमेदवार जाहीर…

Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढील सुनावणीस शिवसेनेचा आक्षेप ; सर्वोच्च न्यायालयात आज नवी याचिका

Posted by - July 26, 2022 0
नवी दिल्ली : शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने…

इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे नावाची चर्चा सुरू होताच पाटण्यात पोस्टरवॉर

Posted by - December 20, 2023 0
नवी दिल्ली: नुकतीच इंडिया आघाडीचे बैठक राजधानी नवी दिल्लीत संपन्न झाली सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ठाकरे…
State Government

Mumbai High Court : ’12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा’; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *