Mumbai News

Mumbai News : भारतीय शूटरच्या मदतीने दहशतवादी हल्ला करणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज

342 0

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai News) वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये आज पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला. मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले मेसेजमध्ये?
या धमकीच्या मेसेजमध्ये मुंबईमध्ये हल्ला करण्यासोबतच योगी आणि मोदी यांनाही लक्ष्य करणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात 12 जुलैला हा मेसेज आला होता. हा मेसेज सायंकाळी साडेचारच्या सुमारास आला असून तो आखाती देशातून आल्याचं म्हटले जात आहे.

या मेसेज प्रकरणामागे मध्य प्रदेशातील एक तरुण असल्याचा संशय आहे. तो कामानिमित्त सध्या आखाती देशात आहे. हा मेसेज तोच पाठवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तो आखाती देशात असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण जात आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत असून पोलीस या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

Share This News

Related Post

पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेची उमेदवारी मिळवलेल्या उमा खापरे आहेत तरी कोण ?

Posted by - June 8, 2022 0
मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान…

मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Posted by - February 12, 2023 0
मुंबई:  सातत्यानं वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात…
Nagpur

नागपूरमध्ये कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले…

Weather Updates : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार; ‘मंदोस’ चक्रीवादळाचा परिणाम

Posted by - December 10, 2022 0
महाराष्ट्र : हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची हुडहुडी भरू लागली असताना थंडीच्या दिवसांमध्येच महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…
Bengaluru Cafe Blast

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Posted by - March 9, 2024 0
पुणे : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणात आता महत्वाची बातमी समोर आली आहे. या स्फोटाचं पुणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *