dheeraj-ghate

पुणे शहर भाजपात भाकरी फिरली! धीरज घाटे नवे शहराध्यक्ष

521 0

पुणे: आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुळीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे . त्यांची हि नियुक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी जाहीर केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतरच पुणे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. धीरज घाटे यांच्यासह दीपक पोटे, माधुरी मिसाळ, राजेश येनपुरे यांची नावं शहराध्यक्ष पदाच्या चर्चेत होती अखेर घाटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे.


धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी पक्ष संघटनेत सुद्धा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत सध्या ते पुणे शहर प्रभारी व प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहत होते.

या निवडीनंतर घाटे म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. राज्यात भाजपा सेना राष्ट्रवादीचे असलेले मजबूत सरकार केंद्रात हिंदुस्थानचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनत असताना ही जबाबदारी मिळालेली आहे. पुणे शहरात भारतीय जनता पार्टी येत्या सर्व निवडणुका अत्यंत जोमाने जिंकून आणून पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करणार आहे. या पदाचा वापर हा सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं पक्षसंघटना मजबूत बांधून ती एकसंध टिकवून ठेवणार असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

 

Share This News

Related Post

dK Shivkumar

डी.के.शिवकुमार यांच्या ‘त्या’ एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण

Posted by - May 17, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये (Karnatak election) काँग्रेसला (Congress0 स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना 22 वर्षांनंतर बहुमत…

किरीट सोमय्या दापोलीला निघाले परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी प्रतीकात्मक हातोडा घेऊन

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी निघाले आहेत. दापोलीला परिवहन मंत्री अनिल परब यांचे…

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास भाजप बरोबर जाणार का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..

Posted by - June 21, 2022 0
नवी दिल्ली- शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास…
traffic jam

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर (Mumbai Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा…

अखेर एमपीएससीला अध्यक्ष मिळाला! रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Posted by - October 3, 2023 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *