RCB

RCB च्या संघात होणार मोठे बदल; 2024 पूर्वी ‘या’ दोन दिग्गजांना RCB करणार अलविदा

593 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबीने संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेट संचालक माईक हेसन यांच्यासोबतचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही मागच्या 5 वर्षांपासून RCB च्या संघाबरोबर जोडले गेले आहेत. तरीदेखील ते संघाला चॅम्पियन बनवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता लवकरच आरसीबी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहे.

…तर माझा मृत्यू झाला असता; RCB च्या ‘या’ खेळाडूचा मोठा खुलासा

संजय बांगर आणि माईक हेसन यांचा करार पाच वर्षांसाठी होता, तो वाढवण्याची चर्चा जोर धरू लागली होती पण आता फ्रँचायझी या दोघांना सोडण्याचा विचार करत आहेत. आयपीएलच्या 16 हंगामांपैकी आरसीबीला एकदाही चॅम्पियन बनता आलेले नाही. यांच्याव्यतिरिक्त गोलंदाजी प्रशिक्षक अ‍ॅडम ग्रिफिथ पुढील हंगामात संघात राहणार की नाही याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. संजय बांगर आणि माईक हेसन यांचे आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये चांगले संबंध होते.

Asian Games 2023: आशियाई खेळांसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ यंगस्टारकडे देण्यात आली कर्णधारपदाची धुरा

RCB नव्या प्रशिक्षकाच्या शोधात
माइक हेसन आणि संजय बांगर यांच्यानंतर आता आरसीबी (RCB) संघ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मात्र, फ्रँचायझी परदेशी प्रशिक्षक घेणार की भारतीय हे स्पष्ट झालेले नाही. 2024 ची आयपीएल सुरु होण्यापूर्वी संघात काही मोठे बदल पाहायला मिळतील. अशा स्थितीत आता नव्या प्रशिक्षकासह नव्या सत्रात संघ नव्याने सुरुवात करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Virat Kohli

Virat Kohli : कोहली ‘विराट’ विक्रमापासून 1 पाऊल दूर; अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला फलंदाज

Posted by - April 2, 2024 0
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना त्याने 3 सामन्यात…
Mohammed Shami

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Posted by - February 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपली पत्नी हसीन…
virender sehwag

ICC Hall of Fame : सेहवागसह ‘या’ 3 दिग्गजांचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Posted by - November 13, 2023 0
मुंबई : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये (ICC,Hall of Fame) तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर…
Dattajirao Gaikwad

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaikwad) यांनी मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी…

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश ‘रौप्य’ तर सोनिया ‘कांस्य’ पदकाची मानकरी

Posted by - September 28, 2022 0
जी२ दर्जाच्या तिसऱ्या माऊंट एव्हरेस्ट चषक खुल्या तायक्वांदो स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीने  रौप्य तर सोनिया भारद्वाजने कांस्य पदकाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *