उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

136 0

उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग येणे, त्वचेला खाज येणे असे त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढत असल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल बिघडल्याने देखील त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःची काळजी जाणून घ्या

* आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे खावी त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. फळे, फळांचा रस, ताक, भाज्यांचा रस, सूप इत्यादी पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा.
* सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण याव्यतिरिक्त दर दोन ते तीन तासांनी नाश्ता म्हणून फळे खावीत यामुळे शरीरातील उष्णता आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत होते.
* नाश्त्यामध्ये सर्वात प्रथम फळे आणि नंतर प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश व्हायला हवा. दोन्ही वेळच्या जेवणात चौरस आहार असायला हवा चपाती, भाजी, डाळ, कोशिंबीर हे सर्व पदार्थ ताटात असावेत.
* उन्हाळ्यात पापड, भजी असे तेलकट पदार्थ शक्यतो घेऊ नये. सोबत दोन चार खजुर ठेवावेत त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
* उन्हाळ्यात थोडासा व्यायाम करावा,अनेकदा उन्हाळा वाढला म्हणून व्यायामाला सुट्टी देतात तसे न करता जर उन्हाचा त्रास होत असेल तर घरातल्या घरात व्यायाम करावा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* उन्हात घराबाहेर जाताना त्रास होऊ नये म्हणून चेहरा आणि डोकं झाकण्यासाठी टोपी, स्काफ,छत्रीचा वापर करावा.

Share This News

Related Post

RBI

RBI : मे महिन्यात १२ दिवस बँकांचे काम राहणार ठप्प; RBI ने जाहीर केली यादी

Posted by - April 23, 2024 0
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादी नुसार मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये…

तीन नव्या शानदार एसयुव्ही लवकरच बाजारात येणार ! तुम्हाला नक्की आवडतील. पहा फीचर्स

Posted by - April 3, 2023 0
आगामी काळात ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणाऱ्या तीन नव्या एसयुव्ही लवकरच बाजारात येणार आहेत. कोणत्या कंपनीच्या या एसयुव्ही आहेत जाणून घेऊया…
Jail

Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…
Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : “तुम्हें आईने की जरुरत नहीं”; अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - December 8, 2023 0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच त्यांचे…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *