Shahrukh Khan And Sunny Deol

Shah Rukh Khan : ‘जवान’ चित्रपटातील ‘त्या’ डायलॉगवरून भिडले किंग खान अन् सनी देओलचे फॅन्स; काय आहे नेमके प्रकरण?

363 0

मुंबई : काही दिवसांपूर्वीच किंग खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाचा टीझर समोर आला होता. त्या टीझरमुळे शाहरुख खान (Shah Rukh Khan) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटात तो याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती ‘जवान’ मधील त्याच्या एका डायलॉगची. या डायलॉगचे कनेक्शन थेट सनी देओल सोबत जोडलं जातंय. ‘जेव्हा मी व्हिलन बनतो, तेव्हा माझ्यासमोर कोणीही हिरो टिकू शकत नाही…’ ‘जवान’चा हा डायलॉग ऐकून चाहत्यांनी, शाहरुख खानने सनी देओलची खिल्ली उडवली आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता किंग खान अन् सनी देओलचे फॅन्स एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. या सगळ्यामागे एक खास किस्सा दडलेला आहे.

Urfi Javed : उर्फी जावेद बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? ‘या’ चित्रपटात दिसू शकते

काय आहे तो 30 वर्षांपूर्वीचा किस्सा ?
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सनी देओल यांनी 30 वर्षांपूर्वी ‘डर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ज्यामध्ये सनी देओलने नायकाची भूमिका केली होती, तर शाहरुख खान खलनायक बनला होता. तेव्हा या चित्रपटातील शाहरुखची व्हिलनची भूमिका सुपरहिट ठरली होती. तेव्हा शाहरुख इंडस्ट्रीत नवीनच होता. त्यामुळे एक नवोदित अभिनेत्याने संपूर्ण लाइमलाइट लुटल्याचा राग सनी देओलला आला होता. यानंतर सनीच्या वडिलांनी म्हणजेच धर्मेंद्र यांनी मद्यधुंद अवस्थेत तेव्हा यश चोप्रा यांच्यासोबत याच गोष्टीवरून वाद घालत सनी आता कधीही शाहरुखसोबत काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. 30 वर्षांनंतरसुद्धा सनी देओलने ही शपथ मोडलेली नाही.

Alia Bhatt : ‘झुमका गिरा रे’चं रिक्रेशन अन् आलियाचे फायर एक्सप्रेशन्स

त्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सनीला चित्रपटातील दोन पात्रांपैकी एक निवडण्यास सांगितले होते, त्यानंतर त्याने हिरोची निवड केली आणि व्हिलनची भूमिका शाहरुखच्या पारड्यात पडली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सनी देओल पेक्षा शाहरुख खानची भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर सनी देओलने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने ‘मला माहित नव्हते की ते चित्रपटात खलनायकाला एवढं चांगलं दाखवतील. मी चित्रपटात नेहमी मोकळ्या मनाने काम करतो आणि माणसांवर विश्वास ठेवतो. ‘ अशी खदखद व्यक्त केली होती. जवळपास 16 वर्षे सनी देओल आणि शाहरुख खान एकमेकांशी बोलले नव्हते.

Share This News

Related Post

बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता ‘ररा’ लघुपटात

Posted by - August 7, 2022 0
पुणे : महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध ‘ररा’ हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या…
LokSabha

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Posted by - March 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा (LokSabha) निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाने उमेदवारी…

अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

Posted by - March 13, 2023 0
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यंदाच्या अकादमी…

PHOTO : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात म्हणाली , ” दुवाओ मे याद रखियेगा “…!

Posted by - August 11, 2022 0
मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे . शिल्पाने स्वतः तिच्या अकाउंट वरून तिच्या…
Ashok Saraf

Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Posted by - January 30, 2024 0
मुंबई : गेली अनेक दशके आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्वतःच एक वेगळं असं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *