Sharad Pawar And Ajit Pawar

Maharashtra Politics : पुलोद सरकार ते अजित पवार बंड..! ‘या’ घटनांमुळे घडला होता महाराष्ट्रात राजकीय भूकंप

561 0

मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नाट्यमय घडामोडी घडत आहे. नुकतच अजित पवारांनी सत्ताधारासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि नागरिकांना मोठा धक्का बसला मात्र याआधीही असे राजकीय भूकंप घडले आहेत जे कधीच कोणीही विसरू शकणार नाही. चला तर मग नजर टाकुयात महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) कधीही न विसरता येणाऱ्या राजकीय भूकंपावर

महाराष्ट्रात कधीही न विसरता येणारी घटना म्हणजे शरद पवारांनी 1978 मध्ये केलेला बंड.
1977 ला आणीबाणी उठल्यानंतर काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आणि काँग्रेसचे दोन पक्ष बनले. एक इंदिरा काँग्रेस आणि एक रेड्डी काँग्रेस. यात रेड्डी काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार होते. आणि या दोघांचा विरोधी पक्ष होता,जनता पक्ष.वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात सरकारची स्थापना झाली. तर इंदिरा काँग्रेसमधील नेते नासिकराव तिरपुडे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं. आणि तुलनेने नवख्या असलेल्या शरद पवारांना उद्योगमंत्री करण्यात आले होते.पण शरद पवारांच्या महत्वकांक्षा यापेक्षा मोठ्या होत्या. यामुळेचं शरद पवार हे सरकार स्थापन झाल्यापासुनच जनता पक्षातील नेत्यांच्या संपर्कांत होते. वसंतदादा पाटील सरकार सुरळीत चालवण्यासाठी प्रयत्न करत होते.पण अवघ्या साडेचार महिन्यातच शरद पवार यांच्या बंडामुळे हे सरकार कोसळलं. ते पण विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असताना. त्यानंतर लगेचच 38 वर्षीय शरद पवार यांनी आपल्या 40 आमदारांसह समाजवादी काँग्रेस नावाने नविन पुलोद स्थापन केल. आणि जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं आणि स्वत: मुख्यमंत्री बनले.

Sharad Pawar: अजित पवारांच्या बंडाचे खरे सूत्रधार शरद पवारचं? ‘ही’ आहेत कारणे

यानंतरची सगळ्याना लक्षात राहणारी घटना ज्यामुळं राजकीय भूकंप आला होता ती म्हणजे. 2019 चा पहाटेचा शपथ विधी
23 नोव्हेंबर 2019 हा असा दिवस होता ज्यादिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी राज्यपाल पदावर असलेले भगतसिंह कोश्यारी यांनी या दोघांना शपथ दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडून निकाल लागले होते. खरंतर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जनतेने बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे पद वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्षांचं भांडण झालं ते विकोपाला गेलं. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी एका बैठकीतून अजित पवार उठून गेले ते थेट 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेतानाच दिसले. पहाटेचा शपथविधी म्हणून हा शपथविधी अगदी रविवारी दुपारचा शपथविधी होईपर्यंत चर्चेत होता. त्याआधी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. 23 नोव्हेंबर 2019 ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांचं ते बंड अवघ्या 80 तासांमध्ये मोडून काढलं. अजित पवार यांनाही त्यांनी माघारी आणलं. शरद पवारांनी अजित पवारांचं बंड फक्त मोडून काढलं नाही तर ते संपवलं अशी चर्चा तेव्हा झाली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते. या सरकारची दोन वर्षे करोना आणि लॉकडाऊन यामध्ये गेली.

त्यानंतर सहा महिन्यांनी आणखी एक भूकंप होणार आहे याची महाराष्ट्राला मुळीच कल्पना नव्हती. 21 जून 2022 ही महाराष्ट्रातल्या दुसऱ्या राजकीय भूकंपाची तारीख ठरली.एकनाथ शिंदेंचं बंड हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड आणि इतर कुणाही पेक्षा वेगळं बंड ठरलं. कारण शिवसेना सत्तेत असताना सत्ता सोडून एकनाथ शिंदे हे त्यावेळच्या विरोधी पक्षासह भाजपात गेले. एकनाथ शिंदे यांनी पक्षावरही दावा सांगितला आणि चिन्हावरही. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण हा त्यांना बहाल केला. तर उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षात एकाकी पडल्यासारखेच झाले. मोजके आमदार आणि मोजके खासदार यांना बरोबर घेऊन ते पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. मात्र शिंदे गटातलं इनकमिंग आणि ठाकरे गटातलं आऊटगोईंग हे काही थांबताना दिसत नाही हे वास्तव आहे. ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट ही लढाई सर्वोच्च न्यायालयातही झाली. न्यायलायाने निकाल देताना उद्धव ठाकरेंसह जे झालं ते योग्य नव्हतं अशी टिपण्णी नोंदवली, राज्यपालांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. पण अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता याविषयीचा निर्णय घ्यायचा आहे ते या परिस्थितीचा अभ्यास करत आहेत. मात्र शिवसेनेत पडलेली ही फूट आणि त्यानंतर घडलेला राजकीय भूकंप याची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली आहे.

NCP News : अजित पवार आणि शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादी आली समोर

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या बंडा नंतर राजकारणात कुठे तरी स्थिरता येतं असताना परत एकदा मोठी घटना घडली आणि ती म्हणजे अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून अनेक आमदारांसह शिंदे फडणवीसा सरकारमध्ये प्रवेश केला. राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली शरद पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. अर्थात शरद पवार हे या गोष्टीला धक्का मानायला तयार नाहीत. कारण आपण जनतेत जाणार आहोत आणि जनताच निर्णय घेईल असं त्यांचं मत आहे. पण महाराष्ट्रातील अचानक मोठा पक्ष फूटन ही सगळ्यांसाठीच धक्कादायक घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे आणखी अनपेक्षित भूकंप घडणार का हे पाहण आता महत्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

Posted by - March 21, 2022 0
चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या…
Satara News

Satara News : हृदयविकाराच्या झटक्याने बीएसएफ जवानाचं निधन

Posted by - October 26, 2023 0
सातारा : सातारा (Satara News) तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र, पश्चिम बंगाल येथे बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय…

पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

Posted by - March 30, 2022 0
पुणे- देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसात ही आठवी इंधन…

अभिनेता रणवीर कपूरनं AskMeAnything च्या माध्यमातून साधला चाहत्यांशी संवाद

Posted by - March 18, 2022 0
बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानीची जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर…

पंकजा मुंडे यांना डावलून विधान परिषदेची उमेदवारी मिळवलेल्या उमा खापरे आहेत तरी कोण ?

Posted by - June 8, 2022 0
मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *