रश्मी शुक्ला यांना दिलासा; 25 मार्चपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही

112 0

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल एफआयार रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली होती.रश्मी शुक्ला यांनी गुन्हा दाखल होताच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करु नका, अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयानं निर्देश दिले आहेत.

Share This News

Related Post

Sanjay and Sunil Raut

संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचला?

Posted by - June 15, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)…
Accident News

Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

Posted by - January 16, 2024 0
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पुसद दिग्रस मार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बेलगव्हान घाटामध्ये हा अपघात झाला असून…

शिवसेनेची परंपरा आम्ही जोपासतोय, आमचा दसरा मेळावा होणारच; आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य

Posted by - September 15, 2022 0
बुलढाणा  : आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण आमचा दसरा मेळावा हा होणारच. शिवसेनेची परंपरा आम्ही जोपासत आहोत त्यामुळं आम्ही…

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पदकं

Posted by - June 12, 2022 0
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात…
Wari Video

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

Posted by - June 20, 2023 0
पुणे : सबंध महाराष्ट्र सध्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीनं (Wari Video) झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *