pune crime

Pune Crime : अजबच ! लग्नास नकार दिल्याने चक्क महिलेने तरुणालाच पळवलं

351 0

पुणे : पुण्यात (Pune Crime) MPSC ची गुणवंत विद्यार्थिनी दर्शना पवारची हत्या एकतर्फी प्रेमातून तिच्याच मित्राने केल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच काल पुण्यातील (Pune Crime) सदाशिव पेठेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणानंतर संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे राज्य आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

याच दरम्यान आता लग्नास नकार दिल्याने एका विवाहित महिलेने तरुणाचे अपहरण केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार,गुजरातमधील वापी येथे सोलापूर येथील 23 वर्षीय तरुण खासगी कंपनीत नोकरी करतो आणि त्याचा भाऊ पुण्यातील एनडीए गेट रस्ता परिसरात राहतो. याच दरम्यान त्याचे एका 20 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले.

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

तरुणाच्या आई- वडिलांनी त्याचे लग्न ठरवण्यासाठी त्याला सोलापूरला घरी बोलावून घेतल्याने ही विवाहित महिला संतापली आणि तिने चार दिवसापूर्वी एनडीए (Pune Crime) रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना पैसे देऊन त्यांच्या साथीने या तरुणाचे अपहरण केले. या महिलेने तरुणाचे अपहरण करण्यासाठी 2 जणांना सुपारी दिल्याचं तपासातून निष्पन्न झाले आहे. दरम्यान या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये सापडला तरुण
पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवली. त्यानंतर पोलिसांना आरोपी गुजरातमधील वापी परिसरात एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळली. यानंतर त्यांनी वापी येथे जाऊन हॉटेलवर छापा टाकून तरुणाची सुटका केली.

Share This News

Related Post

University Of Pune

University of Pune : पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर; विद्यापीठाकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

Posted by - November 3, 2023 0
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे – शरद पवार

Posted by - November 5, 2022 0
शिर्डी : तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची…

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून; 6 दिवस चालणार प्रत्यक्ष कामकाज

Posted by - August 11, 2022 0
मुंबई: मंत्रिमंडळ विस्तारामुळे रखडलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून प्रत्यक्ष कामकाज सहा दिवस होणार…
Bhayandar Crime

अखेर! ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे उलगडले रहस्य; दोघांना अटक

Posted by - June 3, 2023 0
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली…

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी राजकीय मतभेद विसरून आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एक साथ ; पहा photo

Posted by - September 9, 2022 0
पुणे : आज लाडक्या गणरायाला घराघरातून निरोप देण्याची तयारी सुरु आहे. दहा दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आज श्री गणेशाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *