ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

344 0

मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. काल मंगळवारी ईडीने सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या घरावर छापा टाकला होता. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत या अगोदर ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सीबीआयने सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

सचिन सावंत सध्या सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला आहे. सचिन सावंत हे ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांची एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणासंबंधित चौकशी सुरु होती.

या छाप्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी सावंत (Sachin Sawant) यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेतली आहे. सचिन सावंत यांनी यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून काम केले होते. काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. या घोटाळ्याप्रकरणी सचिन सावंत यांची चौकशी सुरु आहे.

Share This News

Related Post

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

Posted by - January 4, 2023 0
सांगली: सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. सांगलीतील…

हृदय पिळवटून टाकणारी घटना : घरात वाजत गाजत येणार होती नवरी; पण सिलेंडरचा स्फोट होऊन आई, बहिणींसह पाच जणींचा ओढावला अंत

Posted by - March 2, 2023 0
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील भिंड या ठिकाणी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. त्या दिवशी लग्नाची धामधूम घरामध्ये सुरू होती. आजच नवरी…
Jagdish Mulik

सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर

Posted by - December 7, 2023 0
पुणे, 7 : डिसेंबर रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे कार्यासन…
Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Posted by - April 12, 2024 0
मुंबई : राज्यातील कोकण, मुंबई आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण (Weather Update) होत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह…

पुणे : कलाकारांना मदत करावीशी वाटते ही भावना महत्वाची आहे – अर्चना नेवरेकर

Posted by - November 5, 2022 0
पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून होणारी मदत छोटी नाही तर महत्वाची आहे कारण रामसेतू बांधताना खारीचा वाटाही मोलाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *