Buldhana News

Buldhana News : ट्रकला ओव्हरटेक करणे पडले महागात; पोलिस कर्मचाऱ्यासह महिला गंभीर जखमी

496 0

बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana News) ओव्हरटेक करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. यामध्ये (Buldhana News) समोर चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करताना अंदाज न आल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कार मधील पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या सोबत असलेली 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. अरविंद भाऊलाल बडगे (40, रा.खामगाव) असे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर हा भीषण अपघात झाला.

Accident Viral Video: ओव्हरटेक करणे पडले महागात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

काय घडले नेमके?
कोट आगाराची बस (एम एच 40, एन 8276) खामगाव वरून शेगाव मार्गे अकोटकडे जात होती. त्यावेळी शेगाववरून येणाऱ्या अरविंद भाऊलाल बडगे यांच्या कारने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न फसला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या अकोट आगाराच्या बसला कारची जोरदार धडक बसली. जयपूर लांडे फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कारमधील दोघांसह एसटी बस मधील कु.आराध्या सागर शेलोकार (वय 5, रा.अंजनगाव सुर्जी), दीप्ती नामदेव चांदुरकर (वय 14, रा. कुटासा,ता.अकोट), सौ.लता प्रकाश वानखेडे (वय 65, रा. वडनेर गंगई ता.अकोट), रुपाली सागर शेलकर (वय 25, रा. अंजनगाव सूर्जी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघातातील सर्व जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर कारमधील जखमी पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेवर खामगावच्या सिल्व्हर सिटी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अकोला या ठिकाणी हलवण्यात आले आहे. बडगे खामगाव येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या सुनीता खराटे (30, रा. शिवाजीनगर,खामगाव) या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. सुनिता खराटे या अरविंद बडगे यांच्या कोण आहेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Share This News

Related Post

सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलली, या तारखेपर्यंत करता येणार नावनोंदणी

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना ११ मे च्या मध्यरात्रीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. एमएचटी…

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सगळे विभाग आणि सेलची कार्यकारिणी बरखास्त ! शरद पवारांचा मोठा निर्णय

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) होणार आहेत. तसा निर्णय सर्वोच्च…
Amravati News

Amravati News : अमरावती हादरलं ! पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळलं; अन्…

Posted by - September 26, 2023 0
अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati News) एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. यामध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून त्यांची हत्या केली…

पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ; निवडणूक आयोगाचे महापालिकेला निर्देश

Posted by - August 6, 2022 0
महाराष्ट्र : 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . दरम्यान…

Breaking News ! चीनमध्ये बोइंग 737 विमान डोंगरात कोसळले, 132 प्रवासी होते विमानात

Posted by - March 21, 2022 0
चीनचे बोईंग 737 विमान ग्वांगशी प्रांतात कोसळल्याचे वृत्त आहे. अपघाताच्या वेळी विमानात 133 जण होते असे सांगण्यात येत आहे. चीनच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *