Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या पॅनेलने पवारांच्या पॅनलचा केला पराभव; एकहाती जिंकली निवडणूक

632 0

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची 23 जून रोजी निवडणूक झाली होती. राज्यातील एकूण 281 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती .आज या निवडणुकीचा निकाल लागला असून यात एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने सर्वच 19 जागांवर विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी महामंडळातील प्रस्थापित संघटनांना मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे ,सातवा वेतन आयोग या मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने एसटी कामगारांचा संप चालू होता. त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे.

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना धूळ चारत, नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी मुसंडी मारण्यात यश मिळवले आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जास्त मतदान घेतले आहे. यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेना हे पॅनल सुद्धा आखाड्यात होतं. मात्र, या पॅनललाही सदावर्तेंच्या पॅनलने धक्का दिला.

Share This News

Related Post

PHOTO: काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; राहुल गांधी, सोनिया गांधी, नाना पटोलेंनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - October 17, 2022 0
नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीविषयी चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज सकाळी दहा वाजल्यापासून काँग्रेस…

संभाजीराजेंच्या भाषणानंतर पत्नी संयोगिताराजे का झाल्या भावनाविवश ?

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ‘मला काहीही झालं तर चालेल पण…

मतदानाचा पवित्र अधिकार बजाविण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन

Posted by - February 22, 2023 0
पुणे : चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली असून कोणत्याही प्रलोभनाला बळी…
Raj Thackery

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची…

पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *