Pune Police

Pune Crime : पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

1028 0

पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा (Pune Crime) रजि.नं 142/ 2023 भा.दं.वि. कलम 307, 341, 506 (2) 34 व आर्म अ‍ॅक्ट कलम 4 (25) 3 (25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी हे पत्रकार असुन त्यांचेवर दि. 24/05/2023 रोजी रात्री 19.00 वा. चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या 05 अज्ञात आरोपींनी त्यांचे दुचाकीला गाडी आडवी लावुन त्यांच्या अंगावर मिरची पावडर फेकुन कोयता घेवुन त्यांच्या अंगावर धावुन गेले असता फिर्यादी हे सदर ठिकाणाहून त्यांचा जीव वाचवुन पळुन गेले. त्यानंतर दि. 11/06/2023 रोजी रात्री 21.00 वा. चे सुमारास फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घराजवळ आले असता परत सदर दोन मोपेड वरील 05 अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांचेकडील पिस्तुलमधून एक राउंड फायर केला असता फिर्यादी गाडीवरच खाली वाकल्याने ते त्यातुन वाचले व तेथुन ते सोसायटीचे आतमध्ये गाडी घेवुन गेले व त्यांचेवर झालेला प्राणघातक व जिवघेणा हल्ला झाल्याने फिर्यादी यांनी वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील (Pune Crime) काही आरोपी हे तोंडाला रुमाल व मास्क घालुन तसेच काही आरोपी हे तोंड लपवत डोक्यावर टोपी परिधान करुन रात्रीच्या वेळी हल्ला करीत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले परंतु त्यांची ओळख व गाडयांचे नंबर ओळखणे अतिशय जिकरीचे व अवघड झाले होते. सदर आरोपी हे इंस्टाग्राम व व्हॉट्सअ‍ॅपचे कॉलींगद्वारे एकमेकांचे संपर्कात असल्याने त्याबाबत तात्रीक विश्लेषनामध्ये अडचन येत होती. स्वारगेट तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जवळ जवळ 100 ते 120 सीसीटिव्ही फुटेज चेक केले परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळुन आली. नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग 15 दिवस अहोरात्र चिकाटीने आरोपीचा शोध घेतला असता पो. अं.9820 अनिस शेख, पो. अं. 10016 शिवदत्त गायकवाड, पो.अं. 10147 संदीप घुले, पो.अं. 10062 फिरोज शेख व पो.अं 8239 सोमनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि दाखल गुन्हयातील संशयित आरोपी रांजणगाव येथे जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती दिली असता त्यांनी लागलीच सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेशित केले त्यानंतर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक व पोलीस उप निरीक्षक अशोक येवले यांचे पथक असे दोन पथके तयार करुन सहा.

पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांचे पथक रांजणगावकडे रवाना केले तसेच पो. उप निरी येवले यांचे पथक धायरी भागात थांबुन होते. तरी सदर संशयित आरोपी हे पेरणेफाटा लोणीकंद याठिकाणी थांबले आहेत अशी बातमी मिळाल्याने आम्ही लागलीच सदर बातमीचे ठिकाणी जावुन सापळा थांबलो असता सदर ठिकाणी आकाशी रंगाचा हाफ बाहयाचा टि शर्ट व काळया रंगाचा फुल बाहयाचा टि शर्ट घातलेले दोन इसम सदर ठिकाणी संशयीत रित्या फिरत असल्याचे दिसुन आले तसेच आमची चाहुल लागताच ते जोरात पळुन जात असताना आम्ही लागलीच वरील स्टाफच्या मदतीने त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे 1) प्रथमेश ऊर्फ शंभु धनंजय तोंडे वय 20 वर्षे धंदा रोजंदारी रा. राजेंद्रनगर पी.एम.सी. कॉलनी सी बील्डींग फ्लॅट नं. 114 दत्तवाडी पुणे 2) अभिषेक शिवाजी रोकडे वय 22 वर्षे धंदा बेरोजगार रा. नांदेड गाव जाधवरांच्या वाड्याशेजारी तीसरा मजला असे असल्याचे सांगीतले तसेच सदर आरोपींकडे वर नमुद दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचे इतर साथीदारांचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो. हवा. तारुपो.अं.दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे व रमेश चव्हाण असे मिळुन धायरी, नांदेडगांव या परिसरामध्ये पहाटेचे सुमारास सापळा लावुन 04 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता ते विधीसंघर्षीत असुन त्यांचा दाखल गुन्हयामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन तपासादरम्यान 01 गावठी पिस्टल, 01 जिवंत काडतुस 03 कोयते, गुन्हयात वापरलेल्या 04 दुचाकी गाडया व 03मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा जमिनीच्या आर्थिक व्यवहारातुन सुपारी घेवुन घडला असल्याचे प्रथमदर्शनी तपासावरुन निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्हयातील आरोपी हे अभिलेखावरील आरोपी असुन ते सराईत व घातक हत्यारानीशी वावरत असल्याने त्यांना पकडणे धोकादायक होते तरी वरील स्टाफच्या मदतीने अतिशय सावधगीरीने व शिताफीने त्यांना जेलबंद करण्यात स्वारगेट तपास पथकाला यश आले आहे.

सदरची कामगिरी (Pune Crime) ही मा.श्री. रितेश कुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक सो. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. मा. श्री. नारायण शिरगावकर साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रशांत संदे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, व पोहवा मुकुंद तारु, पोशि सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, दिपक खेदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Share This News

Related Post

ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन; वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

Posted by - January 9, 2023 0
मुंबई : ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलुंड…
Pm Post

‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; राऊतांनी थेट सांगूनच टाकलं !

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections0 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विरोधकांनी एकजूट व्हयला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी…
Mumbai Police Death

Mumbai Police Death : मुंबईतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ वाढलं; तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - May 4, 2024 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या (Mumbai Police Death) धक्कादायक मृत्यूमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस हवालदार विशाल…
Report On Voter

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

Posted by - April 22, 2024 0
पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून देशातील अनेक मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील शिरूर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *