Poster Viral

Poster Viral : औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे; ‘त्या’ पोस्टरवरून वातावरण पेटण्याची शक्यता?

623 0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह औरंगजेबाचा फोटो असलेले पोस्टर (Poster Viral) लावल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या केसरी टूर्स ऑफिसच्या समोर मध्यरात्रीच्या सुमारास हे पोस्टर (Poster Viral) लावण्यात आले. हे पोस्टर नेमके कोणी लावले अद्याप आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे पोस्टर हटवले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची सुरक्षेत कपात?

काय आहे पोस्टरमध्ये ?
माहिममध्ये उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर-औरंगजेब यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर “औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे” असा एकेरी भाषेतील मजकूर लिहिण्यात आला आहे. ‘शिवरायांची जनता’ असं खाली लिहिण्यात आलं आहे. तर #UddhavThackerayForAurangzeb अर्थात औरंगजेबासाठी उद्धव ठाकरे असा हॅशटॅग बॅनरवर खाली छापण्यात आला आहे. या पोस्टरचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला

मुंबईतील माहिम भागातील केसरी टूर्स ऑफिससमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हे बॅनर (Poster Viral) काढून टाकले आहेत. नेमके कोणी हे पोस्टर लावले याचा शोध सुरु आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळीत यांचं अभिनंदन

Posted by - August 27, 2022 0
मुंबई : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांना…

रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. रजनीश…
Buldhana Accsident

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; 8 जण ठार

Posted by - May 23, 2023 0
बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा असाच एक…
Love Story

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : पाकिस्तान सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला…
Congress

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Posted by - April 4, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने लोकसभेच्या तोंडावर तडकाफडकी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *