Monsoon Update

Monsoon Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात 48 तासांत मान्सून होणार दाखल

611 0

पुणे : जून महिना संपत आला तरी अजून राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल न झाल्याने नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र आता हवामान विभागाकडून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच पुढील 48 तासांत मान्सूनच्या (Monsoon Update) सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे ही मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मान्सून येत्या 48 तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस ?
पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात या मान्सूनच्या सारी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरु होण्याची शक्यता आहे.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
पावसाचं पुनरागमन (Monsoon Update) झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. पावसाअभावी कोवळी पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच खोळंबलेल्या पेरण्या अन् दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या महीना झाला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Share This News

Related Post

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, या भेटीबाबत अमित शाहांचा शेलारांना फोन

Posted by - April 12, 2023 0
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.…

Exclusive Report : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या ‘त्या’ शपथविधीला तीन वर्षे पूर्ण

Posted by - November 23, 2022 0
23 नोव्हेंबर 2019 हाच तो दिवस.. स्थळ राजभवन. याच दिवशी महाराष्ट्रचं नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीली होती. सगळीकडे…

राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे

Posted by - November 20, 2022 0
मुंबई: “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता…

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

Posted by - October 11, 2022 0
मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *