Subhedaar Movie Teaser

Subhedaar Movie Teaser : शिवराज अष्टकातील पाचवे अष्टक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ओम राऊतच्या तान्हाजीला देणार टक्कर ?

441 0

मुंबई : सध्या मराठी चित्रपट सृष्टीत शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित सिनेमांचा (Subhedaar Movie Teaser) धडाका लागला आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमे रिलीज होत आहेत. प्रेक्षकदेखील या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद देत आहेत. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणनं तान्हाजीची प्रमुख भुमिका साकारली होती. दरम्यान सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी त्याच्या कथानकावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. पण आता बॉलीवूडच्या या तान्हाजी चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ‘सुभेदार’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (Subhedaar Movie Teaser) येतोय. हा सिनेमात शिवरायांचा अत्यंत जवळचा मावळा सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शूर पराक्रमाची कथा सांगण्यात येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे. याआधी ‘फर्जंद’, ‘फक्तेशिकस्त’, ‘पानवखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या सिनेमाच्या यशानंतर सुभेदार हा पाचवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचा दमदार टीझर (Subhedaar Movie Teaser) प्रदर्शित झाला आहे. यावेळीही शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुभेदारच्या टीझरमध्ये सध्या तरी फक्त ही दोनच पात्र दाखवण्यात आली आहे.

‘दामाद है वो पाकिस्तान का…’; दमदार डायलॉगसह Gadar 2चा Teaser रिलीज

या आधी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेते अजय पुरकर सुभेदार सिनेमा तान्हाजी मालुसरेंची भुमिका साकारणार असल्याचं समोर आलं होतं. “आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार”, असं म्हणत अजय पुरकर यांनी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या टीझरनंतर (Subhedaar Movie Teaser) आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. सुभेदारचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ओम राऊतच्या तान्हाजी: द अनसंग वॉरिअर या सिनेमाशी तुलना करायला सुरुवात केली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शिक शिवराज अष्टकातील आधीचे चारही सिनेमे प्रेक्षकांना आवडले आहेत. त्यामुळे आता सुभेदार तान्हाजीला टक्कर देतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी – कोणी दिले आपल्या पदाचे राजीनामे

Posted by - October 31, 2023 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले…
Bakery Fire

मुंबईतील खारदांडा परिसरात गॅस गळतीमुळे भीषण आग; 6 जण जखमी

Posted by - May 15, 2023 0
मुंबई : मुंबईतील खारदांडा (Khardanda) परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती…
Baipan Bhari Deva

Baipan Bhaari Deva : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पडली ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची भुरळ!

Posted by - August 7, 2023 0
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं आहे. फक्त महिलाच नाही तर…
Uddhav Thackeray

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

Posted by - May 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे…
Pune University Fight

Pune University : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Posted by - November 1, 2023 0
पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन (Pune University) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *