Farmer

Farmer : शेतकऱ्यांसाठी पुढील 8 दिवस चिंताजनक; कृषी आयुक्तांनी दिली ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

322 0

मुंबई : पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांसाठी (Farmer) पुढील 8 दिवस खूप चिंताजनक असणार आहेत. येत्या आठ दिवसांत मान्सून सक्रीय होण्याची नितांत गरज असल्याचे केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी दिली आहे. अद्याप तरी शेतीवर (Farmer) मोठा परिणाम झालेला नाही. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास, अशाप्रकारे तीन-चार वर्षे तरी मान्सूनने जूनमध्ये दगा दिल्याचे दिसले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

पण त्या प्रत्येक वर्षी जूनच्या अखेरच्या आठवड्यात व त्यानंतर जुलैमध्ये महिनाभर चांगला पाऊस बरसला आहे. त्यामुळेच शेती व पेरण्यांचा विचार केल्यास, पुढील आठ दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. तसेच केंद्रीय कृषी विभाग हवामान खात्याच्या समन्वयातून स्थितीवर लक्ष ठेऊन आहे’ असेदेखील ते म्हणाले. चक्रीवादळाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थानात दमदार पाऊस पडला आहे. राजस्थानात मे महिन्यातदेखील पाऊस झाला.

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

ईशान्य व पूर्व भारतात पाऊस पडलेला नाही. चक्रीवादळाचा फायदा गुजरातला मिळाल्याने केवळ गुजरातमध्ये आत्तापर्यंत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मात्र ही तूट तब्बल 88 टक्क्यांवर गेली आहे. राज्यात 11 जूनला पावसाचे आगमन झाल्यानंतर कोकणामध्ये काही शेतकऱ्यांनी (Farmer) भाताची रोवणीही केली. मात्र गेल्या नऊ दिवसांपासून पावसाचा प्रवास रखडला आहे. त्यातच तापमानवाढीमुळे रोवणी केलेली पिके करपली आहेत.

Share This News

Related Post

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

Posted by - May 25, 2022 0
पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या…
KCR

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

Posted by - June 26, 2023 0
सोलापूर : बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) हे आषाढी वारीनिमित्त दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.…

महत्वाची बातमी ! शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अखेर केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Posted by - May 14, 2022 0
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीच्या आरोपपत्रात अजित पवारांचं नावच नाही

Posted by - April 12, 2023 0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं (ED) एक आरोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी…

घोषणा देतानाच अस्वस्थ वाटलं… युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे हार्टअटॅकने निधन

Posted by - April 6, 2023 0
ठाणे शहरात आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *