तीन मिनिटात 180 कोटीची विकासकामे मंजूर, पिंपरी महापालिका स्थायीचा पराक्रम

118 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या तीन मिनिटाच्या ऑनलाइन सभेत 180 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. निवडणूक निधी उभारण्यासाठी घाई गडबडीत विकासकामे मंजूर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सदस्यांची मुदत 13 मार्च 2022 ला संपत असल्याने अगदी घाईघाईत विकास कामे मंजूर करण्याचा सपाटा महापालिकेतील सत्ताधारी भाजपने लावला आहे. यामध्ये महापालिका आयुक्त देखील मागे राहिलेले दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील 22 कोटी रुपयांचा निधी ऐनवेळी मंजूर करून घेतला आहे.

स्थायी समिती बैठक सुरू होत असताना फक्त 36 प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. मात्र, ऐनवेळी जवळपास 50 विकासकामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले. अशी एकूण 180 कोटी रुपयांची 86 विकासकामे स्थायी समितीने फक्त 30 मिनिटात मंजूर केली आहेत. स्थायी समितीच्या कामकाजावर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक निधी उभा करण्यासाठी आणि कंत्राटदारांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी स्थायी समिती अतिशय घाईगडबडीत विकासकामे मंजूर करत आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

Share This News

Related Post

अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

Posted by - June 30, 2024 0
देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष…

व्हॉट्सॲपने लॉन्च केलं नवीन फीचर ; वाचा काय आहे नवीन फीचर

Posted by - March 19, 2022 0
अलीकडच्या काळात व्हॉट्सॲपने अनेक फीचर्स लॉन्च केले आहेत. आता या ॲपने पुढचे पाऊल टाकत एक नवे फिचर युजर्ससाठी आणले आहे.…
Sambhaji Raje

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण लागू केल्याने छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री आणि सरकारचे मानले आभार

Posted by - February 20, 2024 0
मुंबई : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका…

चिंताजनक : ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट देणार १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

Posted by - November 22, 2022 0
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटा ही लवकरच दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. तथापि कंपनीने अद्याप…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत स्थानिक आमदाराने केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *