पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

195 0

पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत मेट्रोतून प्रवास करत येणार असल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे मेट्रो हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे,असे मानत पुणेकरही मेट्रोतून प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत.

येत्या 6 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर मेट्रो ट्रेन दिवसातून 12 वेळा गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यान धावणार आहे. म्हणजेच सुरुवातीला एका तासाला ही गाडी प्रवाशांना सेवा पुरवेल.

ही आहेत वैशिष्ट्ये

*एका डब्यात 325, तर तीन डब्यांमध्ये असणार 975 प्रवासी
*दिवसभरात 11 हजार 700 प्रवाशांना करता येणार प्रवास
*एक डब्बा महिलांसाठी असणार राखीव
*पुणेकरांना 3 कोचच्या 34 मेट्रो ट्रेन पुरविणार सेवा
*वनाज येथे पार्किंग आणि देखभाल दुरूस्ती

असे आहे वेळापत्रक

*सकाळी पहिली गाडी – सकाळी 7 वाजता
*शेवटची गाडी – रात्री 10 वाजता
*दर तासाला किंवा अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध
*तिकीट कमीत कमी 10 रु. जास्तीत जास्त 50 रु.

Share This News

Related Post

Supreme Court : सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्टला होणार सुनावणी ; प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठात जाणार ?

Posted by - August 4, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आता 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे हे प्रकरण आता लार्जर बेंच कडे दिले जावे…

पुण्याची हवा प्रदूषित ! हवेची गुणवत्ता ‘वाईट’ श्रेणीत

Posted by - December 12, 2022 0
पुणे : ‘चांगल्या हवेचे शहर’ अशी काही वर्षांपूर्वी असलेली पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे.पुण्याच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खराब नोंदवण्यात…
Pune News

Ram Mandir : सुनील देवधर यांच्या पुढाकाराने प्रभू श्रीरामाची 100 फूट भव्य रंगावली साकारण्यात येणार; विविध कार्यक्रमांचे होणार आयोजन

Posted by - January 17, 2024 0
पुणे : प्रभू श्रीरामाची 100 फूट भव्य रंगावली, रामचरित्रावर (Ram Mandir) अखंड गायन-भजन- नृत्य सादरीकरण,श्री रामायणावरील 125 चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम…

UPDATES : ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्त्वाची सुनावणी सुरु !

Posted by - January 20, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगासमोर आज चार वाजता ‘धनुष्यबाण’ कोणाचं ? या महत्त्वाच्या दाव्यावर सुनावणी होते आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी…
Crime

पुण्यात उत्तमनगर परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

Posted by - May 9, 2022 0
पुणे- उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *