Ashish Deshmukh

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

606 0

नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या (Ashish Deshmukh) या प्रवेशानंतर भाजपने त्यांच्यावर भाजपच्या विदर्भाच्या ओबीसी सेलची जबाबदारी सोपवली आहे.

Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित
काही दिवसापूर्वी आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपाची काँग्रेस पक्षाने गंभीर दाखल घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही आशिष देशमुख सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करत राहिले त्यामुळे त्याना काँग्रेस पक्षाने ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते.

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आशिष देशमुख यांचा राजकीय प्रवास
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे पुत्र आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांचे पुतणे.काटोल मतदारसंघातून 2014 ते 2019 या कालावधीमध्ये ते भाजपाचे आमदार होते. पुढं फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यानी काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ज्यात त्यांना 59893 मते मिळाली. पण त्यांचा 49344 मतांनी पराभव झाला. दरम्यान आता आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशनात पुन्हा एकदा काटोल मध्ये काका पुतण्यांची लढत पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

नाशिक पदवीधर निवडणूक: सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय

Posted by - February 3, 2023 0
नाशिक: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला पराभव करत सत्यजित…
Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

Posted by - March 24, 2024 0
अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी…
BARC

BARC Scientist Suicide: भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या

Posted by - August 30, 2023 0
मुंबई : चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचं कौतुक करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे मुंबईत मात्र एका शास्त्रज्ञाने आत्म्हत्या (BARC…

मोठा निर्णय : राज्यातील ‘त्या’ 2 महत्त्वाच्या केसेस CBI कडे वर्ग करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे निर्देश ; पोलीस अधिकारी आणि काही मोठे राजकीय नेते CBI च्या रडारवर

Posted by - July 23, 2022 0
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. तर अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील दोन महत्त्वाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *