Rohit And Babar Azam

Asia Cup 2023 ची तारीख ठरली ! ‘या’ दोन देशांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

898 0

क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया चषक 2023 वरून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. या आशिया चषकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.IND vs PAK हा बहुचर्चित सामना श्रीलंकेत पार पडणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्यामुळे ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

कशी असेल स्पर्धा ?
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत आशिया चषक दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण 13 वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.

कुठे खेळवण्यात येणार सामने?
या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Rohit Sharma

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Posted by - January 8, 2024 0
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IPL 2024) काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत…

खेळ जगत : रोहित शर्माच्या षटकाराने सामना पाहायला आलेली चिमुरडी जखमी ; त्यानंतर रोहितने केले असे काही …पहा व्हिडिओ (Video)

Posted by - July 13, 2022 0
इंग्लंड : मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १० गडी राखून इंडिया विरुद्ध इंग्लंड…

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

Posted by - November 10, 2023 0
पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम…
Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा; ‘या’ ठिकाणी रंगणार कुस्त्यांचे सामने

Posted by - September 25, 2023 0
पुणे : राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी (Maharashtra Kesari 2023) एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य…
IPL

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का ! मोहम्मद शमीसह ‘हे’ 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Posted by - March 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *