Aged Women

पोटच्या मुलांकडून जन्मदात्यांचा सर्वाधिक छळ; धक्कादायक अहवाल आला समोर

439 0

नागपूर : स्त्रीला कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ मानले जाते. मात्र आजच्या घडीला वृद्ध महिलांची अवस्था चिंताजनक आहे. म्हाताऱ्या आजींच्या छळामध्ये तब्बल 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये पोटच्या पोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिवसाच्या पूर्वसंध्येवर हेल्पेज इंडियाचा राष्ट्रीय स्तरावरील सर्व्हेक्षणावर हा अहवाल आहे. या अहवालानुसार ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः वृद्ध महिलांची एकूणच स्थिती चिंताजनक आहे.

काय आहे या अहवालामध्ये ?
अलीकडच्या काळात शारीरिक महिलांवरील हिंसा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जवळपास 50 टक्के वृद्ध महिलांनी छळ अनुभवल्याचे, 46 टक्के जणींनी दर्जाहीन वागणूक मिळत असल्याचे आणि 40 टक्के जणींनी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे सांगितले. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे छळ करणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक 40 टक्के आहे. त्याखालोखाल इतर नातेवाईकांकडून 31 टक्के आणि सुनेकडून 27 टक्के अत्याचार करण्यात येत असल्याचे अहवालात समोर आले आहे.

अहवालातील काही ठळक मुद्दे
16 टक्क्यांनी वाढले म्हाताऱ्या आजींवरील अत्याचार

छळ करणाऱ्यांमध्ये मुले आघाडीवर

27 टक्के सुनांकडून सासूंचा छळ

40 टक्के जणींचा शारीरिक व मानसिक अत्याचार

56 टक्के म्हाताऱ्या अत्याचाराविरोधात तक्रार करीत नाहीत

78 टक्के वृद्ध स्त्रियांना सरकारी योजनांची माहिती नाही

66 टक्के वृद्ध महिलांकडे मालमत्ताच नाही

59 टक्के वृद्ध स्त्रियांकडे स्मार्टफोन्सदेखील नाहीत

48 टक्के वृद्ध स्त्रियांना किमान एकतरी गंभीर आजार

64 टक्के स्त्रियांचा आरोग्य विमाच नाही

Share This News

Related Post

सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू

Posted by - June 26, 2022 0
किल्ले सिंहगडावर अचानक कोसळलेल्या दरडीत अडकून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी…

सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा 15 दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Posted by - February 16, 2023 0
पुणे : जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी…
Jalna Muncipality

Jalna Municipality : जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका; राज्य सरकारची घोषणा

Posted by - May 10, 2023 0
जालना : जालना नगरपालिकेचे (Jalna Municipality) रुपांतर आता महापालिकेत होणार आहे. त्यामुळे जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका असणार आहे.…
Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेवटपर्यंत साथ निभावली; पतीच्या निधनानंतर पत्नीनेदेखील सोडला जीव

Posted by - September 24, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी…
Shivsena Logo

Shivsena Demand : बांगलादेशी नागरिकांसह परदेशी नागरिकांवर तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील महत्त्वाचे शहर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे सुविख्यात आहे. गेल्या काही दिवसापासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *