Supriya Sule

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी

317 0

पुणे : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना भारत सरकारने काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से (CEO Jack Dorsey) यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.

प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयालाच टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या दिल्या गेल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Share This News

Related Post

#crime : 16 वर्षीय मुलाचे 32 वर्षीय महिलेसोबत होते शारीरिक संबंध; महिलेने अश्लील चित्रपट पाहण्यासाठी दिला होता मोबाईल, मुलाच्या आईने थेट…

Posted by - January 30, 2023 0
कल्याण : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिक मधील एका 32 वर्षीय महिलेवर पीडित मुलाच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.…
Buldhana News

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - March 1, 2024 0
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाघाची शिकार…
Jitendra Awhad

Jitendra Awhad : विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

Posted by - July 2, 2023 0
पुणे : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 4, 2022 0
पुणे- अन्नधान्य वितरण कार्यालयातील निरीक्षक महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या…
NIA Raid

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Posted by - December 9, 2023 0
पुणे : महाराष्ट्रात इसिस मॉड्युलशी संबंधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने पुन्हा एकदा पुण्यात (Pune NIA Raid) मोठी कारवाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *