Shinde Fadanvis Decision

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

296 0

मुंबई : आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दराने मदत देण्यात येणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित होते. या शेतकऱ्यांना आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांना आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. आजच्या बैठकीत हे नवीन दर निश्चित करण्यात आले. या दरानुसार जिरायत जमिनीसाठी 8 हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे.

मागच्या वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. खरीप हंगामात झालेल्या या अतिवृष्टीमुळे बाजरी, कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला होता. तर रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला होता.

Share This News

Related Post

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Posted by - March 11, 2022 0
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 4, 2022 0
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि नवाब मलिक यांचा राजीनामा हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे तर…
Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Posted by - June 1, 2024 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग अपघाताचे (Samruddhi Highway Accident)…
Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…
Raigad News

Raigad News : कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेऊन विवाहित महिलेची मुलीसह आत्महत्या; मैत्रिणीला पाठवलेल्या ‘त्या’ मेसेजमधून झाला खुलासा

Posted by - December 1, 2023 0
रायगड : रायगड (Raigad News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *