Shinde - Fadanvis

‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदेच्या ‘त्या’ सर्वेची होतेय सर्वत्र चर्चा

576 0

मुंबई : मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यावेळी राज्यात फडणवीस सरकार होते. त्यावेळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (shivsena) वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सगळ्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातीची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या जाहीरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना (Eknath Shinde) सर्वाधिक पसंती देण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती’ देण्यात आली आहे तर फडणवीसांना (Devendra Fadanvis) 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे.

तसेच राज्यातील 49.3% जनतेनं शिंदे-फडणवीस सरकारला पसंती दर्शवली आहे. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीला पुन्हा सत्तेवर आण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याचे या जाहिरातीतून सांगण्यात आले आहे. आता या जाहिरातीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Breaking ! सोलापुरातील चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, जुना वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

Posted by - March 22, 2022 0
सोलापूर- सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये जुना लाकडी वाडा भस्मसात झाला. ही…

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व पुनीत बालन यांची घोषणा

Posted by - April 4, 2023 0
पुणे: जम्मू-काश्मीर खोऱ्यातील दहशतवादग्रस्त कुटुंबांतील मुलाचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने घेतला आहे. याबाबतची…

#CM EKNATH SHINDE : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया…!

Posted by - March 22, 2023 0
मुंबई : आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना; चर्चांना उधाण

Posted by - November 10, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज…
Praful Patel

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

Posted by - July 2, 2023 0
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावून, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *