India Vs Pakistan

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान

3628 0

वनडे वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ज्याची संपूर्ण क्रिकेट रसिकांना आतुरता असते असा टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. लवकरच विश्वचषकाबाबत आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. आता फक्त तात्पुरतं वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. फायनल वेळापत्रक अजून बाकी आहे.

‘या’ दिवशी भिडणार टीम इंडिया अन् पाकिस्तान
गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होईल. तसेच, भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे.

टीम इंडियाचं विश्वचषकातील संपूर्ण शेड्यूल
8 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बंग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर vs साऊथ अफ्रीका, कोलकाता
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर, बंगळुरू

यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

Share This News

Related Post

डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

Posted by - November 23, 2022 0
पुणे : माजी नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड…
IPL

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Posted by - March 25, 2024 0
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2024) सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. आतापर्यंत या सिझनमधील 5 सामने…

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - September 16, 2022 0
पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना…
Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : अखेर जडेजा बनला क्रिकेटचा ‘थालापथी’; CSK ने केली मोठी घोषणा

Posted by - April 9, 2024 0
चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. एमए…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *