Mira Road Murder Case

मीरा रोड हत्याकांडात मनोज सानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतला होता ‘या’ गोष्टीचा आधार

899 0

ठाणे : श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये (Mira Road Murder Case) घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे शिजवले, काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज सानेला (Manoj Sane) अटक केली आहे. या हत्या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

आरोपी मनोज साने याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलचा आधार घेतल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त तो चौकशीदरम्यान वेगवेगळी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करत आहे. आता या प्रकरणी त्यांचे नातेवाईक समोर येताना दिसत आहेत. आरोपी मनोज याने याआधी दोघेही अनाथ असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, मनोजचे काका व इतर नातेवाईक बोरिवली परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. सरस्वतीलाही पाच बहिणी असून त्यातील एक बहीण आता पोलिसांसमोर आली आहे.

या दोघांनी सरस्वतीच्या (Saraswati) घरी जाऊन जेवणही केले होते. आरोपीने प्रथम आपण लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांनी एका मंदिरात विवाह केल्याची माहितीदेखील आरोपीने पोलिसांना दिली आहे. या दोघांची ओळख सन २०१२मध्ये सरस्वती नोकरीच्या शोधात असताना, बोरिवली परिसरात झाली होती. त्याअगोदर सरस्वती तिच्या बहिणीकडे राहायला होती. तत्पूर्वी ती अहमदनगर येथील आपटे अनाथ आश्रमात राहायला होती. आरोपी आणि मृत महिला दोघेही मूळचे अहमदनगरचे असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मनोज पोलिसांना रोज वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देत आहे मात्र त्याने सरस्वतीची हत्या केल्याची कबुली अद्यापही दिलेली नाही.

Share This News

Related Post

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणावर सचिन गोस्वामींची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis)…

रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने रवाना

Posted by - February 26, 2022 0
नवी दिल्ली- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईला रवाना…

मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लतादीदींच्या आठवणींना उजाळा

Posted by - April 24, 2022 0
गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा स्वर म्हणजे युवापिढीसाठी प्रेरणा असून देशाच्या जडणघडणीमध्ये मंगेशकर कुटुंबाचं देशासाठी मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र…

निलेश माझिरे पुन्हा मनसेत ! राज ठाकरेंनीच केली ‘या’ पदावर नियुक्ती

Posted by - June 9, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *