Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

512 0

मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. या हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे.

यानंतर अपात्र आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटालाही तपासणीसाठी बोलण्यात येणार आहे. यानंतर दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या आमदारांच्याअपात्रतेबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अपात्रतेच्या निर्णय़ाला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. जर सर्व नियमाचं पालन करुन निर्णय दिला नाही. तर हा आमदारांवर अन्याय असेल. त्याचाही विचार करणं आवश्यक आहे.

Share This News

Related Post

धक्कादायक ! मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र, तिघांविरोधात गुन्हा

Posted by - May 14, 2022 0
पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग…
jitendra-awhad

Jitendra Awhad : ‘एका मांडीवर फुले, शाहू, आंबेडकर तर दुसऱ्या गोळवलकर..’ आव्हाडांनी पुन्हा अजितदादांना डिवचलं

Posted by - December 23, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. शरद पवार गटाचे…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “..तेव्हा मला बाळासाहेबांनी खूप झापलं होतं”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Posted by - September 2, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची…

Decision of Cabinet meeting : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अतिरिक्त जागांकरिता येणाऱ्या खर्चात राज्याचा हिस्सा

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील 15 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 50 या प्रमाणे एकूण 750 जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मंजूर…
Archana Patil

Archana Patil : अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 7, 2024 0
धाराशिव : धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) नव्या वादात सापडल्या आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *