Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

33484 0

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका बापाने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून (Murder) केला आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व 10 वर्षाचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 7 तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी बापाचे नाव नंदू आत्माराम घोडके (Nandu Atmaram Ghodse) असे आहे. त्यामुळे त्याचे वयोवृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी आपल्या दोन नातवांना जमिनीचे वारसदार बनवले. यात हरिओम घोडके हा आरोपी नंदूचा मुलगा व दुसरा वारसदार म्हणून आत्माराम यांनी मुलीच्या मुलाचे नाव नोंदवले होते. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी व मुलाशी नेहमी वाद घालायचा. घटनेच्या दिवशीदेखील असाच वाद झाला.

याच रागातून नंदूने रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नंदूने पत्नी रेखा घोडके, मुलगा हरिओम घोडके, लहान मुलगा महादेव घोडके यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपी नंदूने घटनास्थळावरून पळ काढला. शेजाऱ्यांनी तिन्ही जखमींना वाशिम येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मोठा मुलगा हरिओम घोडके याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आसेगाव पोलीस स्टेशन (Assegaon Police Station) अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This News

Related Post

UDAYANRAJE BHOSALE : राज्यपालांनी ज्यावेळी हे वक्तव्य केल त्यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि नितीन गडकरी होते, ते का नाही यावर बोलले ?

Posted by - November 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वादंग निर्माण झाला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी आज…

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - January 24, 2023 0
पुणे : माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची…

अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन…
Thane News

Thane News : प्रवाशांच्या मदतीसाठी RPF जवान ट्रेनमध्ये चढला, मात्र उतरताना घात झाला अन्…

Posted by - August 14, 2023 0
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकात एक धक्कादायक (Thane News) घटना घडली आहे. यामध्ये एका RPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

स्टेट बँकेत नोकरीची संधी, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Posted by - April 4, 2023 0
भारतीय स्टेट बँकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र ही नोकरी तरुण नवख्या उमेदवारासाठी नसून पूर्वी सरकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *