एटीएम पिन 4 अंकीच का..? जाणून घ्या यामागील रंजक कारण…

477 0

‘एटीएम’ बँकिंग इतिहासातील सर्वात मोठी देणगीच म्हणावी लागेल.बँक आपल्या खातेदारांना एक कार्ड देते जे त्या बँकेच्या एटीएम मशीन मध्ये टाकून आणि पिन कोड टाकून ग्राहक आपले पैसे काढू शकतो. मात्र आजकाल कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढू शकता. पैसे काढण्यासाठी एटीएम पिन चार अंकीच का असते याबाबत आपल्याला कदाचित माहिती नसावी.

स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड बॅरन जगातील एटीएम मशीनचे शोधक. जॉन यांनी 1969 मध्ये एटीएम मशीनचा शोध लावला आज डिजिटल पेमेंट आणि मोबाईल बँकिंग युग असले तरी एटीएम मशीनची लोकप्रियता आजही कायम आहे. जॉनशी संबंधित एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म भारतातील शिलॉंग शहरात झाला.

जॉन जेव्हा एटीएम मशीन बनवत होते आणि त्यात कोडींग सिस्टम लावत होते. तेव्हा जॉन यांना सुरुवातीला ते 6 अंकी बनवायचे होते अशा परिस्थितीत जेव्हा त्यांनी पत्नी कॅरोलिनला एटीएम वापरण्यास दिले.तेव्हा कॅरोलिन वारंवार 2 अंक विसरली आणि तिला नेहमी 4 अंक आठवत होते. त्यामुळे जॉन यांचा अंदाज होता की सरासरी मानवी मेंदू 6 ऐवजी फक्त 4 अंक लक्षात ठेवण्यास सक्षम आहे.

यानंतर जॉन यांनी एटीएम पिन 6 अंकाऐवजी 4 अंकी केला. तथापि, 6 अंकी पिन ठेवण्यामागे जॉनचा हेतू आहे तो एटीएम सुरक्षित करण्याचा होता. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 पर्यंत असतो. यापैकी 20 टक्के क्रमांक अगदी सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. तथापि, 4 अंकी पिन देखील अधिक सुरक्षित आहेत परंतु 6 अंकी पिन पेक्षा कमी सुरक्षित आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आजही जगातील अनेक देशांमध्ये 6 अंकी एटीएम पिन वापरला जातो.

Share This News

Related Post

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…

Rahul Gandhi : ” देशातील प्रत्येक यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणात “

Posted by - August 5, 2022 0
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रपती भवन नावर मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह…
Rohit Pawar Office

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - July 16, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात…

दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी, पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड

Posted by - February 21, 2022 0
रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा…

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना अटक

Posted by - May 24, 2022 0
चंदीगढ – भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *