Wrestlers-Protest

कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकची माघार; नोकरीत पुन्हा रुजू

640 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी या कुस्तीपटूंनी 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन (Indian wrestlers’ protest 2023) करत होते. मात्र त्यांना 28 मे रोजी पोलिसांनी या कुस्तीपटूंना जंतरमंतर येथून हाकलून लावले होते.

यानंतर या कुस्तीपटूंनी घेतली अमित शहांची भेट
विनेश फोगट (Vinesh Phogat), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती. शनिवारीच कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. कुस्तीपटू साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियन यांनी या भेटीची पुष्टी केली होती. या बैठकीला तेही उपस्थित होते. मात्र, बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी उचलून धरण्यात आली. मात्र या बैठकीत गृहमंत्र्यांकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे सगळे बैठकीतून बाहेर पडले.

साक्षी मलिकने घेतली माघार
यादम्यान कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीपटूंच्या आंदोलनापासून स्वतःला दूर केले. एवढेच नाही तर ती रेल्वेत पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू झाली आहे. साक्षीने या आंदोलनापासून स्वतःला दूर का केले हे मात्र अद्याप समोर आले नाही.

साक्षी मलिकच्या कारकिर्दीवर एक नजर
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकले होते. 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षीने 58 किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर 2015 मध्ये दोहा येथे झालेल्या सीनियर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये साक्षीने 60 किलोमध्ये कांस्यपदक जिंकले. तसेच तिने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये कांस्यपदक जिंकले (58 किलो) कॉमनवेल्थ गेम्स – बर्मिंगहॅम 2022 मध्ये सुवर्ण (62 किलो), ग्लासगो 2014 मध्ये रौप्य (58 किलो), गोल्ड कोस्ट 2018 मध्ये कांस्य (62 किलो). आशियाई चॅम्पियनशिप – दोहा 2015 मध्ये कांस्य (60 किलो), नवी दिल्ली 2017 मध्ये रौप्य (60 किलो), बिशेक 2018 (62 किलो) मध्ये कांस्य, शियान 2019 (62 किलो) मध्ये कांस्य. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप – जोहान्सबर्ग 2013 मध्ये कांस्य (63 किलो), जोहान्सबर्ग 2016 मध्ये गोल्ड (62 किलो) एवढी पदके जिंकली आहेत.

Share This News

Related Post

Punit Balan

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Posted by - December 27, 2023 0
दुबई : वृत्तसंस्था – पुनित बालन ग्रुप (Punit Balan) ईगल्सने वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे…
Narendra Modi

PM Modi : हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

Posted by - November 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी…
Indian Army

भारतीय लष्कराची कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना धाडले कंठस्थानी

Posted by - May 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय लष्करामध्ये (Indian Army) मोठी चकमक…
Team India

Cricket : ICC रँकिंगमध्ये भारताने टी20 अन् टेस्टमध्ये मारली बाजी मात्र वनडेत ‘या’ संघाने मारली बाजी

Posted by - August 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना (Cricket) 59 धावांनी जिंकला आणि या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *