Saswad Crime

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

609 0

पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने धडक देऊन तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सासवड रोड सातवडी या ठिकाणी सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. छाया भाजनदास शिंदे ( वय 45 रा. डवरीनगर, विशाल नगर, आकाशवाणी, हडपसर ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा बायकोनेच रचला कट; अशाप्रकारे झाला खुलासा

काय घडले नेमके?
सासवड (Saswad) रोड सातववाडी येथे प्रशांत सुरसे (Prashat Surse) यांच्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या कडेला छाया शिंदे ह्या रस्ता स्वच्छ करण्याचे काम करीत होत्या. यादरम्यान व्यावसायिक कार जोरात आली आणि तिने सर्वप्रथम फुटपाथला धडक देऊन या महिलेला धडक दिली, महिला समोरच्या चाका खाली अडकल्याने तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. छाया भाजनदास शिंदे (Chhaya Bhajandas Shinde) या महिला महापालिकेच्या ठेकेदाराची कर्मचारी म्हणून काम करीत होत्या.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धक्कादायक ! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड (Pune News) किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. यादरम्यान अनेक धक्कादायक घटना घडतात.…

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

Posted by - February 1, 2022 0
नवी दिल्ली- आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…
Onion,Export,Ban

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

Posted by - May 4, 2024 0
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Export) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी…

दहावी (SSC) बारावीचा (HSC ) निकाल उशिरा लागण्याची शक्यता ? शिक्षकांचा मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार

Posted by - April 23, 2022 0
सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन…
Sanjay Raut

…. म्हणून काँग्रेस, आप पाठोपाठ शिवसेनेचाही नव्या संसदेच्या उदघाटनावर बहिष्कार

Posted by - May 24, 2023 0
नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *