Jalgaon Robbery

खाकी पेशाला काळिमा ! निलंबीत पोलिस उपनिरीक्षकानेच टाकला जळगाव स्टेट बँकेवर दरोडा

658 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 1 जून रोजी भर दिवसा जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत दरोडा (Robbery) टाकण्यात आला. यामुळे संपूर्ण शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण जिल्ह्यात या दरोड्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या दरोडेखोरांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोलिसांनी तातडीने आपली तपासाची सूत्रे हलवून अवघ्या 24 तासात दरोडेखोरांना पकडले.

यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दरोडखोरांमधील मुख्य सूत्रधार हा निलंबित पीएसआय आहे. तसेच या गुन्ह्यात बँकेच्या शिपायाचादेखील सहभाग होता. मनोज सूर्यवंशी (Manoj Suryavanshi) असे या आरोपी शिपायाचे नाव आहे. तो बँकेत रोजंदारीवर शिपाईची नोकरी करायचा. बँकेचा शिपाई असल्याने त्याला बँकेच्या शाखेतील इत्यंभूत माहिती होती. याच गोष्टीचा फायदा उचलत त्याने आपला पाहुणा निलंबित पीएसआय शंकर जासक (Suspended PSI Shankar Jasak) याला बँकेच्या कामकाजाबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर त्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून हा दरोडा टाकला. या दरोड्यामध्ये पीएसआय शंकर जासक याने आपल्या वडिलांनादेखील सामील करून घेतले होते.

कशाप्रकारे टाकला दरोडा?
संबंधित दरोड्याची घटना ही गुरुवारी (1 जून) घडली होती. आरोपी हातात धारदार चॉपरसारखे चाकू घेऊन बँकेत शिरले होते. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांवर दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी बँकेच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना बंधक बनवलं होतं. त्यांनी बँकेतील मोठा मुद्देमाल लुटून नेला होता. विशेष म्हणजे बँक मॅनेजरच्याच दुचाकीवरुन ते पसार झाले होते. अवघ्या 15 मिनिटात त्यांनी हे सगळं कृत्य केले होते.

आरोपींकडून मुद्देमाल केला जप्त
पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्याकडून 17 लाख रोकड आणि 3 कोटी 60 लाखांचे सोने हस्तगत केले. या आरोपींनी लुटलेल्या मुद्देमालमधून 70 हजार रुपये खर्च केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार; गोदावरी एक्स्प्रेसला लागली आग

Posted by - March 22, 2024 0
नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधी एका रेल्वेच्या बोगीला…
Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची…

CHITRA WAGH : “संजय राठोड प्रकरणी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पूजा चव्हाणवर अन्याय झाला तेव्हा का आवाज उठवला नाही ? मी लढायचे कधीच सोडणार नाही…!”

Posted by - December 16, 2022 0
सांगली : सांगलीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड…

भाजपच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

Posted by - July 12, 2022 0
मुंबई : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.   …

विधान परिषद निवडणूक: सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान पूर्ण

Posted by - June 20, 2022 0
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. 10 जागांसाठी भाजपाकडून प्रवीण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *